ETV Bharat / state

आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी शिक्षण प्रवाहात; पुस्तकासोबत करतायेत मैत्री - अकोला बातमी

तेल्हारा तालुक्यातील आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी आता शिक्षण घेत आहे. त्यामुळे हा समाज आता मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही.

tribal Barela family
आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी शिक्षण प्रवाहात
author img

By

Published : Oct 7, 2020, 3:23 PM IST

अकोला - दुर्गम आणि आदिवासी भागात आजही शिक्षण दुरापास्त आहे. शिक्षणापेक्षा मोलमजुरी करून कुटुंबाचा कसा उदरनिर्वाह करायचे हेच एक शिक्षण त्यांना माहिती आहे. परंतु, तेल्हारा तालुक्यातील आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी आता शिक्षण घेत आहे. त्यामुळे हा समाज आता मुख्य प्रवाहात येण्यास वेळ लागणार नाही.

आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी शिक्षण प्रवाहात

हेही वाचा - COVID-19 : भारतातील कोरोना रुग्णांची राज्यनिहाय आकडेवारी, वाचा एका क्लिकवर..

देशात नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ला मान्यता मिळाली आहे. तरी आजही असंख्य आदिवासी कुटुंबात शिक्षण पोहचलेले नाही. सातपुडा पर्वत रांगाच्या पायथ्याशी असंख्य कुटुंब रोजगारासाठी स्थलांतरित होत असतात. यातील मध्य प्रदेश प्रांतातील लिंगी फाटा या गावातून रोजगारासाठी स्थलांतरित होऊन तेल्हारा तालुक्यातील खंडाळा शेत शिवारात आलेल्या मोहन बारेला व अमरसिंह बारेला यांच्या कुटुंबातील आकाश व रंगीता यांच्या रुपात पहिली पिढी पुस्तकांसोबत मैत्री करून निरक्षरतेचा डाग पुसणार आहेत. पोटाला दोन घास मिळावे म्हणून रोजगाराच्या शोधात अवघी हयात जात असल्यामुळे शाळा व शिक्षणाचा प्रकाश ज्यांच्या आयुष्यावर पडला नाही अशा आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी तेल्हारा तालुका बालरक्षक तुलसीदास खिरोडकार यांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा खंडाळा येथे शिक्षण प्रवाहात आली आहे.

tribal Barela family
आदिवासी बारेला कुटुंबातील पहिली पिढी शिक्षण प्रवाहात

कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्यातरी या मुलांच्या शिवाराच्या ठिकाणी जाऊन त्यांच्या शैक्षणिक कारकिर्दीला साक्षर बनवण्याच्या कार्याला टप्प्याटप्प्याने वळणदार करू, असा निर्धार येथील शिक्षकांनी केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.