ETV Bharat / state

प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष पुंडकर यांच्यावर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू - firing on former district president pundkar

तुषार पुंडकर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर हे काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर
जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर
author img

By

Published : Feb 22, 2020, 10:29 AM IST

Updated : Feb 22, 2020, 12:20 PM IST

अकोला - प्रहार जनशक्ती पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष तुषार पुंडकर यांच्यावर अकोट शहर पोलीस वसाहतीत दोन अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याची घटना घडली होती. यानंतर त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे.

निलेश ठोकळ (नेते, प्रहार जनशक्ती पक्ष)

तुषार पुंडकर अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहतीतून शुक्रवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास येत होते. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांचा पाठलाग करत त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यामुळे पुंडकर हे काही क्षणातच रक्ताच्या थारोळ्यात पडले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. तसेच त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यानंतर अकोट येथून पुंडकर यांना अकोला येथे रात्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

घटनास्थळावरून येथील गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन काडतुसे आढळली. घटनास्थळावर उपविभागीय पोलिस अधिकारी, ठाणेदार यांनी भेट दिली. हा हल्ला जुन्या वैमनस्यातून झाला की राजकीय वादातून याविषयी पोलिस तपास करत आहेत. पोलिसांनी हल्लेखोरांच्या शोधासाठी पथके विविध ठिकाणी रवाना केली आहे.

हेही वाचा - डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: तिन्ही आरोपींची शिक्षणाची मागणी फेटाळली

अकोट येथून पुंडकर यांना अकोला येथे रात्री खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आज (शनिवारी) पहाटे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शासकीय रुग्णालयात त्यांचे शवविच्छेदन केल्यानंतर त्यांचा मृतदेह नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. त्यांच्यावर त्यांच्या गावी अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. यावेळी पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह आदी लोकप्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. तसेच अकोट शहरामध्ये पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. तसेच कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये, याची खबरदारी घेण्यात येत आहे. तुषार फुंडकर यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्यावतीने अकोट विधानसभा निवडणूक लढविली होती.

पुंडकर यांना रूग्णालयात दाखल केल्यानंतर राज्यमंत्री बच्चू कडू, आमदार नितीन देशमुख, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष हिदायत पटेल, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संग्राम गावंडे, जिल्हा परिषद सदस्य गजानन पुंडकर, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, अकोला तहसीलदार विजय लोखंडे आदींनी याठिकाणी भेट दिली होती. या खासगी रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होती. रात्रभर रुग्णालयाच्या बाहेर कार्यकर्ते उभे होते.

Last Updated : Feb 22, 2020, 12:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.