अकोला - प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष तुषार फुंडकर यांच्यावर गोळीबार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोट शहर पोलीस ठाण्याच्या मागील पोलीस वसाहतीत संबंधित गोळीबार झाला असून त्यांच्या पाठीत गोळी लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. याबाबत अधिक तपास सुरू असून पोलीस वसाहतीतच गोळीबार झाल्याने खळबळ माजली आहे.

सध्या त्यांना अकोला सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.