अकोला - मूर्तिजापूर-अचलपूर-यवतमाळ दरम्यान चालविल्या जाणाऱ्या शंकुतला रेल्वेचा कारभार चालणाऱ्या सिनिअर सेक्शन इंजिनिअर कार्यालयाला आज आग लागली. आग लागल्याने रेल्वे साहित्यासह दस्तऐवज खाक झाले.
![fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/7328502_32_7328502_1590313483442.png)
या कार्यालयातून सद्यस्थितीत बंद असलेल्या शकुंतला रेल्वेचा कारभार पाहिला जातो. पत्र्यांनी तयार करण्यात आलेल्या या कार्यालयाला पहाटेच्या सुमारास आग लागली. या आगीत कार्यालयात असलेले रेल्वेसंबंधी संपूर्ण दस्तावेज खाक झाले आहे.
![fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02:56_02-fire-7205458_24052020143343_2405f_1590311023_653.jpg)
तर कार्यालयीन कामकाजासाठी वापरण्यात येत असलेले दोन संगणक व फर्निचर आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याने रेल्वे प्रशासनाचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. स्थानिक नगरपरिषदेच्या अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली.
![fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02:56_02-fire-7205458_24052020143343_2405f_1590311023_818.jpg)
मात्र, या कार्यालयात महत्त्वाचे दस्तऐवज असल्याने ही आग लागली, की लावण्यात आली याबद्दल शंका व्यक्त करण्यात येत आहे.
![fire](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/02:56_02-fire-7205458_24052020143343_2405f_1590311023_243.jpg)