अकोला- शहरातील एमआयडीसीमधील अप्पू पॉईंट पॉईंट जवळ असलेल्या जनरल ट्रान्सपोर्ट जवळील भैया ऑटोमोटिव्ह या ऑईल कंपनीला मंगळवारी रात्री आठ वाजता आग लागली. या आगीमध्ये कंपनीतील ऑईल व इतर साहित्य व इतर साहित्य जळाले असून त्यामुळे लाखो रुपयांचे रुपयांचे नुकसान झाले आहे. या आगीत जीवितहानी झाली नसल्याचे समजते. अग्निशमन दलाच्या तीन गाड्यांच्या सहाय्याने जवानांनी आग आटोक्यात आणली.
भैया ऑटोमोटिव्ह ऑईल कंपनीचे मालक रियाज खान (रा. खामगाव) यांना कंपनीमध्ये आग लागल्याची माहिती माहिती मिळाली. यानंतर त्यांनी अकोला अग्निशमन दलाला आगीची माहिती दिली. अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. ऑईल जळत असल्यामुळे कंपनीतून आगीचे डोंब निघत होते.अग्निशमन दलाने आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले.
आग नेमकी लागली कशामुळे लागली कशामुळे याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. आगीमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याठिकाणी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दाखल झाले होते.