ETV Bharat / state

अमरावतीपाठोपाठ आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर अकोल्यात गुन्हा दाखल - आमदार श्रीकांत देशपांडे अकोला बातमी

परवानगी न घेता एका शाळेत सभा घेतल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

mla shrikant deshpande
आमदार श्रीकांत देशपांडे
author img

By

Published : Nov 21, 2020, 9:37 PM IST

अकोला - कुठलीही परवानगी न घेता, शहरातील एका शाळेत सभा घेतल्याने शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात उभे असलेले आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर रामदासपेठ पोलीस ठाण्यात आपत्ती व्यवस्थापन कायदा व आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - देशाला चुकीच्या दिशेने नेऊन भाजपाने आर्थिक स्थिती बिघडवली - जयंत पाटील

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत उभे असलेल्या आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शहरातील ज्युबली इंग्लिश स्कुलमध्ये निवडणूक संदर्भात बैठक घेतली. या संदर्भात जिल्हाधिकारी यांच्या भरारी पथकातील नायब तहसीलदार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आयोजक श्रीकांत देशपांडे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाची कोणतीही परवानगी न घेता, कोरोनासारख्या साथीच्या रोगाचा प्रसार होईल याची जाण असतानासुद्धा प्रचार बैठकीचे आयोजन केल्याने कलम २६९, २७०, १८८ भादंवीसह आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ब तसेच साथरोग अधिनियम १९९७ कलम २, ३,४ अन्वये रामदासपेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

अमरावतीतही गुन्हा दाखल

अकोल्यात घेतलेल्या बैठकीप्रमाणेच अमरावती येथेही जिल्हाधिकारी कार्यालयाची परवानगी न घेता, बैठक आयोजीत केल्याप्रकरणी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या भंगासह आचारसंहीतेचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहीता लागु असल्याने सदर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

हेही वाचा - ..असे वक्तव्य समाजामध्ये विघटन घडवणारे, कोणत्याही धर्माला कमी लेखणं चुकीचं, प्रकाश आंबेडकरांचा ओवैसींना टोला

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.