अकोला - आतापर्यंत ज्या शेतकऱ्यांनी कापसाचे एक बोंड सुध्दा विकले नाही. ज्या शेतकऱ्यांचा काही प्रमाणात कापूस बाकी आहे, अशा शेतकऱ्यांनी स्वत:च्या कापसाच्या बाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कारण सतत दोन दिवसांपासून कापूस विक्री दरात घसरण सुरू आहे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी केले आहे.
ढेपीच्या खरेदीवर सुध्दा परिणाम-
कापूस पिकावर बोंडअळीमुळे कापसाची व सरकीची खराब झाली आहे. यामुळे ढेप सुध्दा जनावरांच्या आरोग्यासाठी अपायकारक ठरू शकते. त्यामुळे जनावरांवर औषधोपचार सुध्दा करावा लागू शकतो. या कारणांमुळे ढेपीच्या खरेदीवर सुध्दा परिणाम होऊन किमती खाली येऊ शकतात. याचा थेट परिणाम कापसाच्या किंमतीवर होऊ शकतो. म्हणून जिल्हयातील कापूस उत्पादक शेतकर्यांनी कापसाच्या विक्री संदर्भात आपला निर्णय जो काही घ्यायचा आहे तो घ्यावा, असे देंडवे यांनी आवाहन केले आहे.
कापूस विकताना त्याचे मोजमाप समक्ष करून घ्या-
त्यामुळे शेतकऱ्यांनी या सर्व गोष्टीचा विचार करून निर्णय घ्यावा. जेणेकरून त्यांची फसवणूक होणार नाही. कापूस विकताना त्याचे मोजमाप समक्ष करून घ्या. अन्यथा आपल्याला फटका बसू शकतो, अशी चिंता ही त्यांनी व्यक्त केली आहे. आधीच हवालदिल झालेला शेतकरी हा व्यापाऱ्यांच्या कचाट्यात सापडू नये, हीच अपेक्षा वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा- राज्यात 2 लाख लसीकरण पूर्ण; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती