ETV Bharat / state

अकोला जिल्ह्यात पावसाअभावी पिके करपली; बळीराजा संकटात - पिके

पिके सुकून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी की नाही? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

पावसाअभावी पिके करपली ! बळीराजा संकटात
author img

By

Published : Jul 16, 2019, 5:33 PM IST

अकोला - गेल्या पंधरा दिवसापासून पाऊस न पडल्यामुळे पिके करपली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि त्यानंतर 4 दिवसापासून कडक ऊन पडल्यामुळे जमीनही भेगाळली आहे. पिके सुकून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे दुबार पेरणी करावी की नाही? असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.

पावसाअभावी पिके करपली ! बळीराजा संकटात

पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अकोला जिल्ह्यात म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही. मात्र, सुरुवातीच्या 2 पावसानंतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, तूर पेरणी केली. त्यानंतर 8 दिवस ढगाळ वातावरण राहिले. ढगाळ वातावरणानंतर परत 4 दिवस कडक ऊन पडले. त्यामुळे जमिन कोरडी पडून ओलावा नसलेल्या शेतातील पिके करपत आहेत.

बँकेतून काढलेल्या कर्जातून शेतकऱ्यांनी पेरणी तर केली. मात्र, पावसाने दिलेल्या तडीमुळे हे कर्ज फेडण्याइतकेही उत्पन्न निघणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक आले आहे. सावकाराकडे जाण्यासारखी परिस्थिती या शेतकऱ्यांवर उभी राहिली आहे. या काळातच हवामान वेधशाळेना पाऊस पडण्याचा अंदाज सांगूनही पाऊस पडत नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी सावकारी पाशात अडकण्याची शक्यता आहे.

Intro:अकोला - पंधरा दिवसांपासून पाऊस न पडल्यामुळे पिके करपली आहे. गेल्या आठ दिवसांपासून ढगाळ वातावरण आणि त्यानंतर चार दिवसांपासून कडक उन्हामुळे जमीनही भेगाळली आहे. पिके सुकून गेल्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले असून परत पेरणी करावी की नाही असा प्रश्न आता त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. पावसाची सतत ची दांडी यामुळे शेतकरी यावर्षी कोणते पीक घ्यावे या विवंचनेत आहे. तसेच कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी शेतकऱ्यांना सावकारी पाशात अडकण्याची शक्यता आहे.

Body:पावसाळा पंधरा दिवसांनी सुरू झाला असला तरी पेरणीयुक्त पाऊस पडलेला नाही. तरी सुरुवातीच्या दोन पावसानंतर शेतकऱ्यांनी कापूस, सोयाबीन, मूग, तूर पेरणी केली. त्यानंतर सतत आठ दिवस ढगाळ वातावरण राहिले. यासोबतच हवामान वेधशाळेचा अंदाज आज पाऊस पडेल, असे सांगून शेतकऱ्यांची अशा वाढवीत होता. मात्र, वेधशाळेचा हा अंदाज वातावरणाने खोटा ठरविला. ढगाळ वातावरणाच्या चार दिवसानंतर कडक ऊन पडत आहे. या उन्हामुळे जमीनही कोरडी पडली आहे. त्यामुळे ओलावा नसलेल्या शेतातील पिके कोमजली आहे. बँकेतून काढलेल्या कर्जातून शेतकऱ्यांनी शेती पेरली. परंतु, हे कर्ज फेडणे इतकेही उत्पन्न होणार नसल्यामुळे या शेतकऱ्यांवर आर्थिक संकट उभे राहिले आहे. त्यामुळे सावकाराकडे जाण्यासारखी परिस्थिती या शेतकऱ्यांवर उभी राहिली आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.