ETV Bharat / state

खळबळजनक; सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयातच सफाई कामगाराने घेतला गळफास

तीन दिवसांपूर्वी किसनराव हुंडीवाले यांच्या खूनप्रकरणी खळबळ उडाली होती. त्यानंतर याच कार्यालयातील सफाई कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केली.

author img

By

Published : May 9, 2019, 1:07 PM IST

Updated : May 9, 2019, 3:44 PM IST

घटनास्थळावर दाखल झालेले पोलीस

अकोला - सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात तीन दिवसापूर्वी किसनराव हुंडीवाले यांचा खून केल्याने खळबळ उडाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा हे कार्यालय चर्चेत आले असून कार्यालयातील सफाई कामगाराने गळफास घेवून आत्महत्या केली. मोहन संकत असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या सफाई कामगाराचे नाव आहे.

घटनास्थळ

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात सकाळी मोहन संकत हे नियमितपणे आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते. काम करताना त्यांनी कार्यालयातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्यालयात आलेल्या कर्मचार्‍यांना हा प्रकार दिसल्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळावर सिव्हील लाईन पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा दाखल झाला. सर्व कर्मचारी हे कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यानंतर या कार्यालयात कोणीच आले नाही. दरम्यान, या घटनेने या कार्यालयात ही दुसरी घटना अवघ्या चार दिवसाच्या आत घडली आहे. याआधी किसनराव हुंडीवाले यांचा खून या कार्यालयात झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे हे कार्यालय परत चर्चेत आले असून सफाई कर्मचारी संकत यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संकत यांनी आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.

Intro:अकोला - तीन दिवस आधी चॅरिटी कमिशनर कार्यालयामध्ये किसनराव हुंडीवाले यांचा खून केल्याच्या घटनेच्या नंतर याच कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने आज कार्यालयातच गळफास लावून आत्महत्या केली. या घटनेने परत हे कार्यालय चर्चेत आले असून या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. दरम्यान, घटनास्थळावर पोलिसांचा ताफा मोठ्या प्रमाणात उपस्थित असून बघणार्‍यांची गर्दीही कार्यालयाबाहेर झाली आहे. सफाई कर्मचारी मोहन संकत असे मृतकाचे नाव आहे.

Body:सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय व सहाय्यक संस्था निबंधक यांच्या कार्यालयात सकाळी सफाई कर्मचारी मोहन संकत हे नियमितपणे आपल्या कर्तव्यावर हजर झाले होते. काम करीत असताना त्यांनी कार्यालयातील एका खोलीमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. कार्यालयात आलेल्या कर्मचार्‍यांना हा प्रकार दिसला त्यांनी तातडीने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनास्थळ सिव्हील लाईन पोलीस पोलीस अधिकारी यांच्यासह इतर ताफाही दाखल झाला. तसेच आलेले सर्व कर्मचारी हे कार्यालयाच्या बाहेर पडले. त्यानंतर या कार्यालयात कोणीच आले नाही. दरम्यान, या घटनेने या कार्यालयात ही दुसरी घटना अवघ्या चार दिवसाच्या आत घडली आहे. याआधी किसनराव हुंडीवाले यांचा खून या कार्यालयात झाला होता. त्यानंतरची ही दुसरी घटना आहे. या घटनेमुळे हे कार्यालय परत चर्चेत आले असून सफाई कर्मचारी संकट यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सर्वोपचार रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे.
Last Updated : May 9, 2019, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.