ETV Bharat / state

अकोल्यात प्रचार तोफा थंडावल्या, गुरुवारी मतदान - end

दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या प्रचारतोफा आज (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. मागील १८ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज थांबला.

अकोल्यात प्रचार तोफा थंडावल्या, गुरुवारी मतदान
author img

By

Published : Apr 16, 2019, 9:56 PM IST

अकोला - दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या प्रचारतोफा आज (मंगळवारी) सायंकाळी ५ वाजता थंडावल्या. मागील १८ दिवसांपासून सुरू असलेला प्रचार आज थांबला. अकोला लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात एकूण १६ उमेदवार असून त्यापैकी १ महिला उमेदवार आहे. या ठिकाणी १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार १८ एप्रिलला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक प्रक्रियेला १९ मार्चपासून सुरुवात झाली. नामनिर्देशन पत्र २६ मार्चला दाखल करण्यात आली. अकोल्यात १ हजार ७५१ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे. तर मतमोजणी २३ मे ला होणार आहे. निवडणुकीत १८ लाख ५७ हजार ९५१ मतदार मतदान करणार आहेत. यामध्ये ८ लाख ९२ हजार १५९ महिला मतदार आणि ९ लाख ६२ हजार ५७६ पुरुष मतदार आहेत. यापैकी ८५ हजार हे नवीन मतदार वाढले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक निरीक्षक विनोदसिंह गुंजियाल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडत आहे.

Intro:अकोला - दुसऱ्या टप्प्यातील 6 अकोला लोकसभा मतदार संघातील निवडणूकीच्या प्रचारतोफा आज सायंकाळी 5 वाजता थंडावल्या. गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेला प्रचार थांबला. अकोला लोकसभा निवडणुकीत एकूण 16 उमेदवार असून त्यापैकी एक महिला उमेदवार आहेत. तर 18 लाख 57 हजार 951 मतदार 18 एप्रिल रोजी मतदानाचा हक्क बजाविणार आहे.

Body:महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील निवडणूकीची प्रक्रिया 19 मार्च पासून सुरुवात झाली. नामनिर्देशन पत्र 26 मार्च रोजी दाखल करण्यात आली. अकोला लोकसभा मतदार संघात 16 उमेदवार उभे आहेत. 30 मार्चपासून सर्व उमेदवारांनी आपल्या प्रचाराला सुरुवात केली. उमेदवाराना 18 दिवस प्रचाराचा वेळ मिळाला. मतदान 18 एप्रिल रोजी होणार आहे. 1 हजार 751 मतदान केंद्रावर हे मतदान होणार आहे. तर मतमोजणी 23 मे रोजी होणार आहे. 18 लाख 57 हजार 951 मतदार मतदान करणार आहेत. 8 लाख 92 हजार 159 महिला मतदार आणि 9 लाख 62 हजार 576 पुरुष मतदार आहेत. यापैकी 85 हजार हे नवीन मतदार वाढले आहेत. जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक निरीक्षक विनोदसिह गुंजियाल यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक पार पडत आहे. तर 167 झोनल अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासन निवडणूकिसाठी सज्ज झाले आहे.
अकोल्यातील मुख्य लढत तीन पक्षांच्या उमेदवारांमध्ये होत आहे. यापैकी कोण निवडून येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Conclusion:सूचना - सोबत व्हिडीओ आहे
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.