अकोला - मुख्यमंत्री आणि मंत्री वडेट्टीवार यांच्यात सध्या जे राजकारण सुरू आहे. ते राज्याच्या हिताचे नाही. डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याखाली डिझास्टरचे प्रमुख यांना सर्व अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर करून मंत्री यांनी जाहीर केला. हा निर्णय जसेच्या तसा मान्य झाला तर हा मुख्यमंत्री यांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी जर चेअरमन नसल्याने त्यात बदल केला तर तो मंत्र्यांचा अपमान आहे. तेव्हा एकाला कोणालातरी अपमान झाला म्हणून राजीनामा द्यावा लागणार, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांनी डिझास्टर मॅनेजमेंटच्या निर्णयात हस्तक्षेप करणे चुकीचे -
वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे अकोला दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांना राज्यातील राजकीय घडामोडीवर प्रश्न विचारला होता. त्यावेळी ते म्हणाले, डिझास्टर मॅनेजमेंटच्या कायद्याखाली डिझास्टरचे प्रमुख यांना सर्व अधिकार देण्यात आलेले आहेत. जसे निवडणूक कालावधीत अधिकार असतात तशा पद्धतीने डिझास्टरमध्ये मंत्री यांना अधिकार असतात. त्या अधिकाराचा वापर करून मंत्री वडेट्टीवार यांनी निर्णय जाहीर केला, ते आता काँग्रेसचे मंत्री आहेत. अठरा जिल्ह्यातील निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. यावर लगेच मुख्यमंत्री कार्यालयातून असा काही निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यांनी कुठेही स्थगिती म्हटलेले नाही. डिझास्टर मॅनेजमेंट जे निर्णय घेतात आणि त्यांनी घेतलेले निर्णय लागू झाले पाहिजेत, अशी पद्धत आहे. मुख्यमंत्री यांनी त्याअंतर्गत हस्तक्षेप करणे हे माझ्या मते चुकीचे आहे, असे मत प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले आहे.
या खेळांमध्ये सामान्य माणूस कशाला भरडता-
महाराष्ट्राच्या संस्कृतीला न पटणारी अशी ही बाब आहे. उद्या जर डिझास्टर मॅनेजमेंटचे मंत्री किंवा चेअरमन यांनी हे निर्णय जसेच्या तसे जाहीर केले आणि तेच जनतेला मान्य झाले. तर या याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांची नाचक्की आहे. यांच्या खेळांमध्ये सामान्य माणूस कशाला भरडता, असा प्रश्न ही त्यांनी उपस्थित केला आहे.
तर मंत्रिमंडळात राहून उपयोगच काय -
काँग्रेसने आमचा अपमान झाला म्हणून काँग्रेसने या कॅबिनेटमधून बाहेर पडावे. मी सरकारमधून बाहेर पडावा असे म्हणत नाही. मंत्र्यांचा आदरच राखल्या जात नसेल तर त्या मंत्रिमंडळात राहून उपयोग काय, असा प्रश्न आंबेडकर यांनी उपस्थित केला.
काँग्रेसने भुमिका स्पष्ट करावी -
नाना पटोले यांनी सुद्धा याबाबत प्रतिक्रिया दिलेला आहे. तेव्हा एवढेच फक्त सांगेन एकेकाळी शिवसेना बाहेर राहून भाजपवर टीका करीत होती. तेव्हा लोक असेच म्हणत होते की, सत्तेतील फळे खायची आणि टीकाही करायची. एका वेळेस दोन गोष्टी चालत नाही. तेव्हा काँग्रेसनेही लक्षात घ्यावे, दोन गोष्टी एका वेळेस चालणार नाही. तुम्ही टीकाकार असाल तर टीका करा, विरोधी पक्ष असेल तर विरोध करा. कॅबिनेटमध्ये राहायचे असेल तर कॅबिनेटसारखे राहा. आता जर यामध्ये वडेट्टीवार यांनी जाहीर केले आणि जसेच्या तसे मान्य झाले तर मुख्यमंत्री यांचा अपमान आहे. मुख्यमंत्र्यांनी ते चेअरमन नसल्याने त्यांनी बदल केला तर तो मंत्र्यांचा अपमान आहे. तेव्हा एकाला कोणालातरी अपमान झाला म्हणून राजीनामा द्यावा लागणार, अशी प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - 'अनलॉक'वरून विरोधकांच्या हातात आयते कोलीत; तर काँग्रेसकडून सारवासारव