ETV Bharat / state

'बंददरम्यान झालेल्या घटनांवेळी पोलिसांची भूमिका बघ्याची' - महाराष्ट्र चेंबर्स

बंद शांततेत होणे गरजेचे आहे. मात्र, बंदला आता हिंसक वळण येत असून राजकीय पक्ष, संघटना त्यांच्या फायद्यासाठी बंद करीत आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा बंदला आता शासनाने व पोलिसांनी परवानगी देणे टाळले पाहिजे, असेही बिलाला म्हणाले.

बंददरम्यान झालेल्या घटनांवेळी पोलिसांची भूमिका बघ्याची

author img

By

Published : Jan 30, 2020, 8:42 AM IST

अकोला - देशातील कुठल्याही बंदला 'महाराष्ट्र चेंबर्स'ने विरोध दर्शविला आहे. बंद दरम्यान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठल्याही बंदला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता. तरीही आंदोलकांच्या दबावाने व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. या दरम्यान उभ्या असलेल्या पोलिसांची भूमिका मात्र बघ्याची होती, असा आरोप 'विदर्भ चेंबर्स'चे अध्यक्ष राजकुमार बिलाला यांनी आज पत्रकार परिषदेत केला.

राजकुमार बिलाला, अध्यक्ष विदर्भ चेंबर्स असोसिएशन

पुढे ते म्हणाले, बंद शांततेत होणे गरजेचे आहे. मात्र, बंदला आता हिंसक वळण येत असून राजकीय पक्ष, संघटना त्यांच्या फायद्यासाठी बंद करीत आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. तसेच देशाच्या आर्थिक स्थितीवर परिणाम होत आहे. त्यामुळे अशा बंदला आता शासनाने व पोलिसांनी परवानगी देणे टाळले पाहिजे, असेही बिलाला म्हणाले.

हेही वाचा - ३३ आंदोलनकर्त्यांवर गुन्हे दाखल करून घेतले ताब्यात; अकोला पोलिसांची कारवाई

बुधवारी झालेल्या बंदमध्ये अनेकांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ केली, दुकाने जबरदस्ती बंद करण्यास भाग पाडले. काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी असलेल्या पोलिसांनी योग्य ती कृती केली नाही. चौकाचौकात उभे असलेले पोलीस हे बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. यानंतर होणाऱ्या बंदबाबत सर्वच व्यापारी एकत्र येऊन पुढील बंदला विरोध करणार, असेही 'विदर्भ चेंबर्स असोसिएशन'चे अध्यक्ष राजकुमार बिलाला यांनी सांगितले.

हेही वाचा - बंदला हिंसक वळण; पातूरमध्ये दगडफेक, पोलिसांचा सौम्य लाठीमार

Intro:अकोला - कुठल्याही बंद ला महाराष्ट्र चेंबर्सने विरोध दर्शविला आहे. यादरम्यान व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कुठल्याही बंदला प्रतिसाद न देण्याचा निर्णय घेतला होता तरीही नागरिकांच्या झालेल्या गर्दीने व्यापाऱ्यांची दुकाने बंद करण्यास भाग पाडले. या दरम्यान उभ्या असलेल्या पोलिसांची भूमिका हि बघ्याची होती, असा आरोप विदर्भ चेंबर्स चे अध्यक्ष राजकुमार बिलाला यांनी आज पत्रकार परिषदेत केला.Body:पुढे ते म्हणाले, बंद शांततेत राहणे गरजेचे आहे. बंद ला आता हिंसक वळण येत आहे. राजकीय पक्ष, संघटना, त्यांना वाटले व त्यांच्या फायद्यासाठी बंद करीत आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे नुकसान होते. तसेच देशाच्या आर्थिक स्थिती वर परिणाम होत आहे. त्यामुळे आशा बंदला आता शासनाने व पोलिसांनी परवानगी देने टाळले पाहिजे, असेही श्री. बिलाला म्हणाले. आजच्या बंदमध्ये अनेकांनी व्यापाऱ्यांना शिवीगाळ केली, दुकाने जबरदस्तीच्या बंद करण्यास भाग पाडले. काही व्यापाऱ्यांनी त्याला विरोध केला. त्यावेळी असलेल्या पोलिसांनी योग्य ती कृती केली नाही. चौकाचौकात उभी असलेली पोलिस ही आज बघ्याची भूमिका घेत असल्याचे दिसून आले आहे. यानंतर होणाऱ्या बंदबाबत सर्वच व्यापारी एकत्र येऊन पुढील बंदला विरोध करणार, असेही विदर्भ चेंबर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजकुमार बिलाला यांनी सांगितले.

बाईट - राजकुमार बिलाला
अध्यक्ष, विदर्भ चेंबर्स, अकोलाConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.