ETV Bharat / state

अटीतटीच्या लढतीत भारीपचे महासचिव सुलताने विजयी - babhulgaon zp election at akola

अटीतटीच्या ठरलेल्या बाभूळगाव येथील जिल्हा परिषद निवडणुकीत भारीपचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांनी विजय मिळवला आहे.

विजयी उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने
विजयी उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने
author img

By

Published : Jan 8, 2020, 2:24 PM IST

अकोला - जिल्हा परिषद निवडणुकीत अटीतटीच्या ठरलेल्या बाभूळगाव गटातून भारीपचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांनी विजय मिळवला आहे. त्यांना पराभूत करण्यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांसह अनेकांनी ताकद लावली होती. मात्र, अखेर सुलताने यांनी बाजी मारली.

बोलताना विजयी उमेदवार ज्ञानेश्वर सुलताने

जिल्हा परिषद बाभूळगाव गटातून शिवसेनेचे मुकेश मुरूमकर आणि भारिप बहुजन महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांच्यात अटीतटीची लढत होती. विशेष म्हणजे सुलताने यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी ताकद लावली होती. शिवसेनेचे उमेदवार मुकेश मुरूमकर यांनीही प्रचारात आघाडी घेतली होती.

दरम्यान, मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या जिल्हा परिषद गटामधून शिवसेनाच विजयी होणार असल्याची चर्चा जोरात होती. मात्र, अंतिम निकालानंतर सुलताने यांनी विजय मिळवित पक्षाच्या उमेदवाराविरोधात अपप्रचार करणाऱ्यांना दणका दिला.

Intro:अकोला - अतितटीची ठरलेली बाभूळगाव येथील जिल्हा परिषद निवडणुकीत भारीपचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांनी विजय मिळवीला. त्यांना पराभूत करण्यासाठी पक्षातील काही पदाधिकाऱ्यांनी यासोबतच इतरानी ताकद लावली होती.

Body:जिल्हापरिषद बाभुळगाव गटातून शिवसेनेचे मुकेश मुरूम कार आणि भारिप बहुजन महासंघाचे महासचिव ज्ञानेश्वर सुलताने यांच्याबद्दल अटीतटीची लढत होती विशेष म्हणजे यांना पराभूत करण्यासाठी त्यांच्याच पक्षातील अनेक पदाधिकारी यांनी लावली होती शिवसेनेचे उमेदवार मुकेश मुरूमकर यांनी ही प्रचारात आघाडी घेतली होती दरम्यान मतदानाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या जिल्हा परिषद गटामधून शिवसेनेची असल्याची चर्चा जोरात होती मात्र निकालानंतर या जिल्हा परिषद गटामधून विजय मिळवित पक्षाच्या उमेदवाराला विरोधात अपप्रचार करणाऱ्यांना अद्दल घडविली सिद्ध झाले आहे.

बाईट - ज्ञानेश्वर सुलताने
भारीपचे विजयी उमेदवार,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.