अकोला - ग्रामीण भागामध्ये सध्या सर्वच भाजीपाल्याचे दर कमी झाले आहेत. भरीसभर म्हणून लॉकडाऊनची टांगती तलवार असल्याने भाजीपाला कवडीमोल भावाने विकावा लागत आहे, त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. वांग्याला भाव मिळत नसल्याने तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील शेतकऱ्याने वांगे अक्षरश: जनावरांसमोर फेकल्याची घटना घडली आहे.
तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील शेतकरी सुरेश पिलात्रे यांनी त्यांच्या शेतात एक एकरात वांगे, दोन एकरात टमाटे आणि मिरचीचे पीक घेतले होते. परंतु वागे आणि टमाट्याला भाव मिळत नसल्याने त्यांनी वांगे व टमाटे हे जनवारांसमोर फेकले आहेत. भाजीपाल्याला दरच मिळत नसल्याने उत्पादन खर्च देखील निघाला नसल्याची व्याथा थेतकरी सुरेश पिलात्रे यांनी मांडली.
कोरोनाचा भाजी मार्केटवर परिणाम
कोरोनामुळे संपूर्ण बाजारावर परिणाम झाला आहे. बाजारात ठोक भाजीपाला विक्री सध्या बंद आहे. त्यामुळे भाजीपाला शेतातच खराब होऊ चालला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचे पाहायला मिळत आहे.
हेही वाचा - 'पोलीस खात्याचे नेतृत्व फक्त 'सॅल्यूट' घेण्यासाठी नसते', खासदार राऊतांचा सरकारला घरचा आहेर