ETV Bharat / state

दहीगाव गावंडे शेत शिवारात दररोज आढळत आहेत मृत कावळे

आतापर्यंत 6 ते 7 कावळे मृत झाले आहेत. राज्यातील ही पहिलीच घटना आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर मृत कावळ्याचे नमुने घेवून ते भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविणार असल्याचे उपयुक्त डॉ. तुषार भावाने यांनी सांगितले.

akola
akola
author img

By

Published : Jan 7, 2021, 7:24 PM IST

Updated : Jan 7, 2021, 7:44 PM IST

अकोला - जिल्ह्यात मृत कावळे आढळल्याने खळबळ उडाली आहे. अकोला तालुक्यातील दहीगाव गावंडे व परिसरातील शेत शिवारात हे गेल्या तीन ते चार दिवसांत कावळ्यांच्या मृत्यूचे सत्र सुरू आहे. आतापर्यंत 6 ते 7 कावळे मृत झाले आहेत. राज्यातील ही पहिलीच घटना आहे. शासनाच्या पशुसंवर्धन विभागाला याबाबत माहिती दिल्यानंतर मृत कावळ्याचे नमुने घेवून ते भोपाळ येथील प्रयोग शाळेत पाठविणार असल्याचे उपयुक्त डॉ. तुषार बावणे यांनी सांगितले.

केवळ शक्यताच

सध्या सर्वत्र कोरोनाचे संकट कायम असताना, देशात बर्ड फ्लूचे नवे संकट आले आहे. सुदैवाने राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूचा एकही अहवाल समोर आलेला नसला तरी, अकोल्यातील दहिगाव गावंडे आणि परिसरातील शेत शिवारात काही मृत कावळे आणि पक्षी आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, हे कावळ्यांच्या मृत्यूचे दुसरे कारण पाहिल्यावर दिसत नाही. त्याला मार लागलेला नाही. किंवा त्यांना मोठ्या विद्युत तारेचा स्पर्श होवून मृत्यू झाल्याचे दिसत नाही आहे. ज्याठिकाणी हे कावळे मृत आढळले आहेत, त्याठिकाणी मोठ्या विद्युत प्रवाहाच्या वाहिनी गेलेल्या नाहीत.

अलर्ट जारी

काही कावळे हे पोल्ट्री फॉर्मजवळ मृत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. कावळ्यासोबत इतरही एक पक्षी मृत झाला आहे. दरम्यान, गावात कुठेही बदक किंवा कोंबडी मृत झाल्याची माहिती नाही, हे विशेष. मागील काही दिवसांत अनेक राज्यांमध्ये बर्ड फ्लूच्या संसर्गामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे निदर्शनास येत आहे. राज्यात आतापर्यंत बर्ड फ्लूमुळे एकाही पक्ष्याचा मृत्यू झालेला नाही. मात्र, सतर्कता बाळगत शासनाने राज्यभरात अलर्ट जारी केला आहे.

एच5एन8 हा धोकादायक नाही

पक्षांना होणाऱ्या मृत्यूच्या कारणांमध्ये एच5एन8 हा सर्वात कमी धोकादायक आहे. हा फक्त पक्षांना होतो. वाइल्ड तो वाइल्ड आणि संपर्कात आल्यास वाइल्ड तू डोमेस्टिक पक्षांना होतो. परंतु, याच प्रकारातील एच5एन1 हा सर्वात धोकादायक आहे. हा पक्षांमधून माणसांना ही होवू शकतो. हा आढळल्यास शंभरपैकी 60 लोक मृत्यू होतात. परंतु, हा जगभरात सध्यातरी कुठेही आढळला नाही, अशी माहिती डॉ. बावणे यांनी दिली.

बाधित राज्यातील सीमांशी गावाचा संबंध नाही

बर्ल्ड फ्लू हा रोग दवशात पसरत असला तेही अकोला जिल्ह्यात हा प्रकार आढळला आहे, ते गाव कुठल्याही बाधित राज्यांच्या सीमांशी संबंधित नाही आहे. या गावाच्या सीमा या राज्याच्या सीमांच्या जवळ नाही आहेत, हे विशेष.

कोंबड्या खाल्ल्यास परिणाम नाही होणार

सध्या पक्षांमध्ये बर्ल्ड फ्लूसारखी लक्षणे दिसून येत आहेत. इतर राज्यात पोल्ट्री फॉर्म चालकांना नुकसान सोसावे लागत आहे. राज्यात अजून काहीच परिणाम नसला तरी कोंबड्या खाल्ल्यास त्याचा संसर्ग मनुष्याला होण्याची शक्यता नाही. कारण आपण कोंबडी किंवा अंडे खाताना ते उकळून खातो. त्यामुळे त्यावरील किटाणू हे मरून जात असल्याने त्याचा मनुष्याला धोका नसल्याचे डॉ. बावणे म्हणाले. या मृत पक्षाचे नमुने प्रयोग शाळेत पाठवण्यात येणार असून प्रयोग शाळेतून अहवाल आल्यानंतरच हा बर्ड फ्लू आहे का, हे स्पष्ट होणार आहे. तरी खबरदारी बाळगत पशुसंवर्धन विभागामार्फत जिल्ह्यातही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यात कुठेही पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाल्यास त्याची माहिती पशुसंवर्धन विभागाला द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Last Updated : Jan 7, 2021, 7:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.