ETV Bharat / state

अकोल्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह सापडला - महान धरणात मृतदेह सापडला

अकोल्यातील औषध व्यावसायिकाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह महान धरणात सापडला. अमित सावल हा मागील चार दिवसांपासून बेपत्ता होता.

मृत अमित सावल
author img

By

Published : Sep 26, 2019, 4:19 PM IST

अकोला - चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अमित सावल याचा मृतदेह महान धरणात सापडला. संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाने मृतदेह शोधून काढला.

अकोल्यातील औषध व्यवसायिकाच्या बेपत्ता मुलाचा मृतदेह महान धरणात सापडला

शहरातील औषध व्यावसायिकांचा मुलगा अमित सावल हा 23 सप्टेंबरला घरातील दागिने घेवून निघून गेला होता. त्यानंतर त्याचा शोध घेतला असता त्याची दुचाकी महान धरणाजवळ सापडली. त्याची चप्पल, मोबाईल हे महान धरणाच्या गेट क्रमांक तीन दरवाज्यावर सापडली. तेव्हापासून तिथे संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक अमितचा शोध घेत होते. गुरूवारी दुपारी अमितचा मृतदेह शोधण्यात बचाव पथकाला यश आले.

हेही वाचा - पुण्यातील पूरस्थितीकडे लक्ष द्या; मग तिकीट वाटपाच्या चर्चा करा - भुजबळ

दरम्यान, याप्रकरणी अमितच्या वडिलांनी खदान पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारीमध्ये दिलेल्या संशयित व्यक्तींची पोलिसांनी चौकशी केली. यामध्ये एका मुलीसह तिघांचा समावेश आहे. पोलीस संशयितांची कसून चौकशी करत आहेत.

Intro:अकोला - गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असलेले अमित सावल यांचा शेवटी महान धरणात आज दुपारी मृतदेह मिळून आला. त्यांचा शोध संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाने शोधून काढला. दरम्यान, त्यांच्या बेपत्ता होण्याच्या विविध कारणांना विराम मिळाला. त्यांच्या मृत्यूच्या कारणांचा शोध पोलिस घेत असून यामध्ये एका मुलीसह तिघांची चौकशी केली. Body:औषधी व्यवसायिकांचे पुत्र अमित सावल हे 23 सप्टेंबर पासून घरातुन दागिने घेवून निघून गेले होते. त्यानंतर त्यांचा शोध घेतला असता त्यांची दुचाकी ही महान धरणाजवळ सापडली. त्यांची चप्पल, मोबाईल हे महान धरणाच्या गेटवरील क्रमांक तीन दरवाज्याच्या वर सापडली. तिथे पहारा देणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाण्यात उडी मारण्याचा आवाज आणि पक्षी उडाल्याचे दिसले. तेव्हापासून तिथे संत गाडगेबाबा आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथक त्यांचा दिवसरात्र शोध घेत होते. परंतु, त्यांना यश आले नव्हते. शेवटी, त्यांचा दुपारी मृतदेह महान धरणात मिळून आला.
दरम्यान, याप्रकरणी अमितच्या वडिलांनी खदान पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या तक्रारींमध्ये दिलेल्या संशयित व्यक्तीच्या नावानुसार पोलिसांनी चौकशी केली. दरम्यान, या घटनेला ब्लॅकमेलिंग सारखा प्रकार असल्याचे समोर येत आहे. पोलिस संशयितांची कसून चौकशी करीत आहे. दरम्यान, या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

फोटो - मृतक अमित सावलं
व्हिडीओ - महान धरणConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.