अकोला - प्राप्त अहवालात 20 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात 10 महिला व 10 पुरुष रुग्ण आहेत. त्यातील 11 जण हे इंदिरानगर वाडेगाव येथील रहिवासी आहेत. तर उर्वरित सावकारनगर आपातापा रोड, कौलखेड हिंगणाफाटा, देशपांडे प्लॉट, वाठुरकरनगर मंगरुळपीर रोड, सिंदखेड तालुका बार्शीटाकळी, देवी पोलीस लाईन, विजय नगर, जुने शहर व हांडे प्लॉट येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, दुपारी पुन्हा एका रुग्णाचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. हा रुग्ण 70 वर्षीय इसम असून सोनटक्के प्लॉट जुने शहर भागातील रहिवासी आहे. हा रुग्ण 29 मे रोजी दाखल झाला होता. त्याचा उपचारादरम्यान आज मृत्यू झाला. आणखी 18 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील 16 जणांना घरी तर उर्वरित चौघांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे. त्यात सहा महिला व 12 पुरुष आहेत. त्यातील तिघे गायत्री नगर येथील, तिघे खदान येथील, दोन जण काला चबुतरा येथिल तर उर्वरित कौलखेड, रामदास पेठ, जुनेशहर, मुजफ्फर नगर, संताजीनगर, बेलोदे लेआऊट, भरत नगर, खडकी, सिटी कोतवाली व सिंधी कॅम्प येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
*प्राप्त अहवाल-१३६
*पॉझिटीव्ह-२०
*निगेटीव्ह-११६
*आता सद्यस्थिती*
*एकूण पॉझिटिव्ह अहवाल-८८४
*मयत-४२(४१+१)
*डिस्चार्ज-५७७
*दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-२६५