ETV Bharat / state

अकोल्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 54 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह - कोरोना मुक्त जिल्हा

एका मुलीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने अकोला जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 2 झाली आहे.

corona patient number increased in akola
अकोल्यात आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; 54 जणांचे रिपोर्ट आले निगेटिव्ह
author img

By

Published : Apr 18, 2020, 2:24 PM IST

अकोला- कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरू असतानाच शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. अकोल्यातील कोरोनाचा पहिला बळी ठरलेल्या रुग्णाच्या १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण झाली असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. शनिवारी सकाळी मिळालेल्या 55 अहवालांपैकी 54 अहवाल निगेटिव्ह तर एक अहवाल पॉझिटिव्ह आला.

१३ एप्रिल रोजी अकोला शहरातील एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या कुटुंबीयांना आरोग्य विभागाकडून ताब्यात घेण्यात आले होते आणि त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

दरम्यान, शुक्रवारी एकून १२ पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ११ जणांचे फेरतपासणीचे अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा एकच पॉझिटिव्ह रुग्ण होता. तीन वर्षीय बालकाचा फेरतपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. आता आणखी एका १७ वर्षीय मुलीचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात आता दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

१८ एप्रिल रोजी सकाळी प्राप्त अहवाल

प्राप्त अहवाल- ५५पॉझिटिव्ह- ०१निगेटिव्ह-५४

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.