अकोला - दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या वृद्धाचा वृंदावन नगरातील रेल्वे लाईनवर आज दुपारी मृतदेह आढळून आला. या वृद्धाची ओळख पटली असल्याचे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी सांगितले. दरम्यान, भगवान नारायण पाईकराव असे या वृद्धाचे नाव असून याप्रकरणी खदान पोलिस ठाण्याला हरविल्याची तक्रार दाखल होती. या वृद्धाचा मृत्यू मालगाडीच्या धक्क्याने झाला की त्यांचा घात झाला याबाबत अद्याप वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच समजणार असल्याचे ठाणेदार चव्हाण यांनी सांगितले.
![Confusion over the death of an old man found on a railway line in Akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-03-dead-body-7205458_06052020190120_0605f_1588771880_512.jpg)
जठारपेठ चौकातील रुंदावन नगर रेल्वे लाईन वर एक 65 वर्ष वृद्धाचा मृतदेह आढळून आला. या वृद्धांचा स्मृतीभ्रंश होत असल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून ते घरातून निघून गेले होते. याबाबत पोलीस तक्रारही त्यांच्या नातेवाईकांनी केली होती. दरम्यान, भगवान पाईकराव यांचा मृतदेह मिळून आल्यानंतर एमआयडिसी पोलिसांकडून सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये हरविलेल्या व्यक्तींच्या संदर्भात माहिती गोळा करण्यात आली. त्यामधून खदान पोलिसांनी या मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना बोलल्यानंतर त्यांनी त्यांची ओळख पटविली. दरम्यान, त्यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत संभ्रम निर्माण झालेला आहे. हा घातपात आहे की अपघात याबाबत वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच यामध्ये पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचेही एम आय डी सी पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांनी सांगितले आहे.
![Confusion over the death of an old man found on a railway line in Akola](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-akl-03-dead-body-7205458_06052020190120_0605f_1588771880_138.jpg)