ETV Bharat / state

अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दलालांकडून रुग्णांची लूट; तक्रार दाखल - Akola corona latest news

रुग्णाला बेड मिळवून देण्यास हे दलाल अपयशी ठरले तर तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत ते वाद घालत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

वैद्यकीय महाविद्यालयात दलालांकडून रुग्णांची लूट; तक्रार दाखल

author img

By

Published : May 2, 2021, 8:40 AM IST

अकोला - कोरोना रुग्णांसाठी बेड मिळत नसल्याच्या कारणांमुळे अनेक रुग्णांचे नातेवाईक हे सैरावैरा पळत आहेत. परंतु, याच संधीचा फायदा घेत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आरोग्य सेवक असल्याचे सांगून दलालांकडून रुग्णांच्या नातेवाईकांची आर्थिक लूट सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.

सध्या कोरोनाच्या बाधेने अनेक रुग्ण अत्यवस्थ होत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी हे दलाल सक्रिय झाले आहेत. रुग्णाच्या नातेवाईकांकडून हजारो रुपये उकळून त्यांना बेड मिळवून देण्याचे आश्वासन देत आहेत. रुग्णाला बेड मिळवून देण्यास ते अपयशी ठरले तर तेथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत ते वाद घालत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

दोघा विरोधात तक्रार-

अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये तथाकथित आरोग्य सेवक असल्याचे सांगणारे नितीन सपकाळ आणि आनंद शर्मा हे दोघे कोरोना रुग्ण व रुग्णांच्या नातेवाईकांना भेटून त्यांना कोरोना वार्डमध्ये बेड मिळवून देतो, अशी बतावणी करून त्यांच्याकडून हजारो रुपये उकळत आहेत. याबाबतची तक्रार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे 27 एप्रिल रोजी दिली आहे.

अशा आरोग्य सेवकरुपी दलालांवर कारवाई होणे अपेक्षित

विशेष म्हणजे, हे दलाल महाविद्यालयातील बाह्य रुग्ण विभाग, अपघात कक्ष, मुख्य शल्यगृह, अतिदक्षता विभाग, रक्तपेढी अशा नानाविध ठिकाणी वावरत असतात. तेथे येणाऱ्या नागरिकांसोबत ते गोडीगुलाबीने त्यांना महाविद्यालयात उपचार मिळवून देण्यासाठी पैसे मागत असतात. यामुळे महाविद्यालयातील आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम झाला आहे. या दलालांमुळे महाविद्यालयात पैशांशिवाय काम होतं नाही, असा गैरसमज निर्माण होत आहे. परिणामी, या दोन दलालांवर कठोर कारवाई करण्याची मागणी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय अधीक्षक यांनी दिलेल्या तक्रारीत पोलीस अधीक्षकांकडे म्हटले आहे.

अशा प्रकारच्या घटना महाविद्यालयांमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांशी होणे ही गंभीर बाब आहे. या घटनांना कायमचा पाय बंद करण्यासाठी सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षक उत्तम जाधव यांना कारवाईचे हे आदेश दिले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.