ETV Bharat / state

कोरोनाला घाबरण्याची गरज नाही; लक्षणे दिसल्यास १०४ क्रमांकावर संपर्क साधा - जिल्हाधिकारी पापळकर - corona toll free number

नागरीकांनी  करोना व्हायरसची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि सर्वोपचार रूग्णालय येथे स्वतंत्र आयसोलेटेड (विलगीकरण) कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
author img

By

Published : Mar 8, 2020, 3:08 AM IST

अकोला - करोना व्हायरसला घाबरून जाण्याचे काहीही कारण नाही. काळजी घ्या, सावध रहा आणि लक्षणे दिसल्यास त्वरीत शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधावा किंवा संशयित रुग्ण वाटल्यास हेल्पलाईन क्रमांक 104 वर संपर्क साधा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

जिल्हाधिकारी पापळकर यांचे आवाहन

करोना व्हायरसची लक्षणे दिसल्यावर उपचार करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला व सर्वोपचार रूग्णालय येथे स्वतंत्र आयसोलेटेड (विलगीकरण) कक्ष उघडण्यात आलेला आहे. नागरीकांनी करोना व्हायरसची लक्षणे आढळल्यास उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला आणि सर्वोपचार रूग्णालय येथे स्वतंत्र आयसोलेटेड (विलगीकरण) कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

हेही वाचा - धसका 'कोरोना' विषाणूचा; शरद पवारांचा जळगाव दौरा स्थगित

नागरीकांनी आपले हात साबन व पाणी वापरून स्वच्छ धुवावे, शिंकताना व खोकलतांना नाकावर व तोंडावर रूमाला धरावा, सर्दी किंवा फ्ल्यू सदृष्य लक्षणे असलेल्या लोकांशी संपर्क टाळावा, जंगली अथवा पाळीव प्राण्यांशी निकटचा संपर्क टाळावा, मांस आणि अंडी पुर्णपणे शिजवून उकडून खावीत, गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून स्वत:चा बचाव करावा आदी उपाययोजना केल्यास करोना व्हायरस पासून स्वत:चा इतरांचा बचाव होवू शकतो. असे आवाहन त्यांनी केले.

करोना व्हायरस लागण झाल्यावर सर्दी होते परंतू नाक वाहत नाही तसेच ताप पण येतो आदी लक्षणे आढळून आल्यास रूग्णांनी त्वरीत वैद्यकीय सल्ला घ्या. लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये, स्वत: उपचार करू नये, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्यावा. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथील दुरध्वनी क्रमांक 0724- 2434401 किंवा हेल्पलाईन क्रमांक 104 वर संपर्क साधून आयसोलेटेड कक्षात जाऊन योग्य उपचार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

हेही वाचा - आर्या आंबेकरच्या मराठमोळ्या गाण्यावर शिल्पा शेट्टीचा टिकटॉक व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.