ETV Bharat / state

मुंबई केंद्रशासित करण्यासोबतच केंद्र सरकार करणार वेगळा विदर्भ; प्रकाश आंबेडकरांचा आरोप - प्रकाश आंबेडकर अकोला पत्रकार परिषद

अचानकपणे राज्याचे विभाजन करून मुंबई केंद्रशासित प्रदेश केला जाईल. त्यानंतर जो असंतोष पसरेल तो कमी करण्यासाठी वेगळ्या विदर्भाची भूमिका केंद्र सरकार घेईल, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Nov 22, 2019, 10:05 PM IST

अकोला - 370 कलम रद्द करताना कुठल्याच प्रकारची चर्चा केंद्र सरकारने केली नव्हती. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विभाजन करतानाही केंद्र सरकार कुठल्याच बाबतीत चर्चा करणार नाही. अचानकपणे राज्याचे विभाजन करून मुंबई केंद्रशासित प्रदेश केला जाईल. त्यानंतर जो असंतोष पसरेल तो कमी करण्यासाठी वेगळ्या विदर्भाची भूमिका केंद्र सरकार घेईल, असा आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केला.

मुंबई केंद्रशासित प्रदेश करून केंद्र सरकार करणार वेगळा विदर्भ

अकोला येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर बोलत होते. मागील 26 दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेचे नाटक सुरू आहे. काँग्रेसने अजूनही शिवसेने सोबत जाण्याविषयी कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोअर कमिटीच्या बैठका घेतल्या. मात्र, सत्ता स्थापनेसंदर्भात आपापल्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक या दोन्ही पक्षांनी घेतली नाही. त्यामुळे यात शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे, असेही ते म्हणाले.

सर्वच राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलत आहे. परंतु, शेतमजूरांबाबत कोणीच बोलत नाही. शेतमजुरांसाठी इजीएसची कामे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी आंबेडकरांनी केली. काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली होती. राज्यपाल त्याची अंमलबजावणी करणार का? केंद्र सरकार याबाबत राज्यपालांना निर्देश देईल का, असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले.

शेतकरी ज्यावेळी कर्ज घेतो, त्यावेळी विमा काढला जातो. प्रत्येक जिल्ह्यामध्ये विम्याच्या नावावर पैसा कापला जातो. त्याच्या एजन्सीज् कोणत्या आहेत, याची माहिती शासनाने जाहीर करावी, अशी मागणीही प्रकाश आंबेडकरांनी केली. या पत्रकार परिषदेला प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, प्रमोद देडवे, प्रदीप वानखडे हे उपस्थित होते.

Intro:अकोला - 370 कलम रद्द करताना कुठल्याच प्रकारची चर्चा केंद्र सरकारने केली नव्हती. त्याच प्रमाणे महाराष्ट्र राज्याचे विभाजन करताना केंद्र सरकार कुठल्या बाबतीत चर्चा करणार नाही. अचानकपणे राज्याचे विभाजन करून मुंबई केंद्रशासित प्रदेश केल्यानंतर जो काही असंतोष होईल त्या असंतोषाला कमी करण्यासाठी वेगळ्या विदर्भाची भूमिका केंद्र सरकार घेवून डिफॉल्ट वेगळा विदर्भ करण्याची भूमिका केंद्र सरकारची राहील असा आरोप एड. प्रकाश आंबेडकर यांनी आज केला.

Body:ते अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. पुढे ते म्हणाले, 26 दिवसांपासून राज्यात सरकार स्थापनेचे नाटक सुरू असताना शिवसेनेचा पोपट होऊ नये एवढीच इच्छा आहे. काँग्रेसची अजूनही शिवसेना युतीबाबत कोणतीही अधिकृत घोषणा नाही. काँग्रेसने याबाबत आपली अधिकृत भूमिका स्पष्ट करावी, असेही ते म्हणाले. शिवसेनेसोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या कोर कमिटीच्या बैठका घेतल्या. मात्र, सत्ता स्थापनेसंदर्भात आपापल्या पक्षाच्या कार्यकारिणीची बैठक या दोन्ही पक्षांनी घेतली नाही. या बैठकीत शिवसेनेसोबत जाण्याचा कुठलाच निर्णय न झाल्याचे दिसून आले नाही, असे ही ते म्हणाले.
सर्वच राजकीय पक्ष हे शेतकऱ्यांच्या नुकसानीबाबत बोलत आहे. परंतु, शेतमजूर बाबत कोणीच बोलत नाही. शेतमजुरांसाठी इजीएसची कामे लवकरात लवकर सुरू करण्याची मागणी त्यांनी यावेळी केली. त्यासोबतच काळजीवाहू मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी दहा हजार कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना जाहीर केली होती. राज्यपाल त्याची अंमलबजावणी करणार का?, केंद्र सरकार याबाबत राज्यपालांना निर्देश येईल का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच शेतकरी ज्यावेळी कर्ज घेतो, त्यावेळी विमा काढला जातो. शासनाने प्रत्येक जिल्ह्यामध्ये जो विमाच्या नावावर पैसा कापला जातो त्याच्या एजन्सिज कोण कोण आहेत, याची माहिती जाहीर करावी, अशी मागणीही वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. पत्रकार परिषदेला प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, प्रमोद देडवे, प्रदीप वानखडे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Conclusion:सूचना - अकोला येथे प्रकाश आंबेडकर यांची झालेल्या पत्रकार परिषदेचा व्हिडिओ डेक्स ला मिळाला असल्याचे खातरजमा करण्यात आली असून बातमी लगेच पाठवीत आहे कृपया मिळालेला व्हिडिओ हा त्या बातमीसोबत लावावा ही विनंती
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.