अकोला - पाकिस्तान जिंदाबादचे नारे जे लागले हे आम्ही पाहिले, आणि म्हणून ही मागणी केली की पीएफआवर बंदी घालावी. केंद्र सरकारने ही मागणी मान्य केली, त्याचे आम्ही स्वागत करतो. (Popular Front of India) पण हा उशिरा का झाला असा प्रश्न उपस्थित करत किती लोकांनी त्या आंतकवाद्यांना मदत केली याचा रिपोर्ट जनतेला सरकारने द्यावा अशी मागणीही पटोले यांनी केली आहे.
यावेळी पटोले यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर ही शंका व्यक्त केली. ज्यावेळेस शिवसेनेने 16 आमदारांचे पत्र दिले होते त्यांच्यावर कारवाई करावी, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाने त्यात हस्तक्षेप केला. त्या प्रक्रियेला स्थगिती दिली. (Congress State President Nana Patole) मग चिन्हाचा वाद आला. त्यांच्यातही निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली. या पद्धतीचा संभ्रम न्यायव्यवस्थेने निर्माण करणे हा शंकेचा भाग आहे. दरम्यान, खरे तर आमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. पण न्यायव्यवस्थेवर संभ्रम निर्माण होणे हा लोकशाहीसाठी सर्वात मोठा धोका आहे, असेही पटोले म्हणाले आहेत.
सहा जिल्ह्याला एक पालकमंत्री म्हणजे लहन पोरांचा स्पायडरमॅन असे म्हणत पटोले यांची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला आहे. इतके जिल्हे एका व्यक्तीकडे असतील तर कुठल्या जिल्ह्याला न्याय मिळणार, किती वेळ देणार हा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. या पद्धतीची राज्यातील लोकशाही व जनतेची थट्टा करण्याचे पाप जे भाजप करते आहे हे फार वाईट आहे, याचा आम्ही निषेध करतो, असही पटोले म्हणाले आहेत.