ETV Bharat / state

Akola Crime : एक लाख रूपयांची लाच घेणाऱ्या आरपीएफ ठाणेदाराला सीबीआयने पकडले रंगेहात; पोलिस कोठडी

author img

By

Published : Mar 11, 2023, 10:53 PM IST

दक्षिण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाणेदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात अटक केली. तर खासगी इसम सुरेश चंदन यालाही अटक करून या दोघांसह मध्यस्थी करणारा सय्यद मुजमीर अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणी तपास करीत आहेत.

Akola Crime
Akola Crime

अकोला : येथील दक्षिण रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा बलाच्या ठाणेदाराला एक लाख रुपयांची लाच घेताना सीबीआयने रंगेहात अटक केली. सोबतच एका खासगी व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. दोघांनाही अमरावती येथील सीबीआय कोर्टात शनिवारी हजर केले असता न्यायालयाने १४ मार्चपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. तर यातील एक जण हा फरार असल्याची माहिती आहे.

काय आहे प्रकरण? : मुकेशकुमार मीना असे लाचखोर ठाणेदाराचे नाव आहे. तर त्याला मदत करणाऱ्या खासगी इसमाचे नाव सुरेश चंदन आहे. तक्रारदाराच्या वडिलाविरूद्ध आरपीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामीनावर सोडण्यासाठीचा अभिप्राय न्यायालयात देण्याच्या बदल्यात ठाणेदार मुकेशकुमार मिणा याने तीन लाख रूपयांची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदाराने नागपूर सीबीआयकडे तक्रार केली. सीबीआयने शनिवारी सापळा रचून मुकेशकुमार याला एक लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात अटक केली. तर खासगी इसम सुरेश चंदन यालाही अटक करून या दोघांसह मध्यस्थी करणारा सय्यद मुजमीर अशा तिघांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीबीआयचे अधिकारी या प्रकरणी तपास करीत आहेत.

आरपीएफ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ : आरपीएफ ठाणेदारावरील ही पहिलीच कारवाई आहे. या कारवाईमुळे आरपीएफ कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या कारवाईने आरपीएफमधील भ्रष्टाचार समोर आला आहे. दरम्यान अकोला रेल्वे पोलिस दलातील ठाणेदार आणि पोलिस कर्मचाऱ्यांवर अशी कारवाई काही वर्षांपूर्वी झाली होती. तक्रारदाराच्या वडिलाविरूद्ध आरपीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्या गुन्ह्यामध्ये अटक न करता जामीनावर सोडण्यासाठीचा अभिप्राय न्यायालयात देण्याच्या बदल्यात ठाणेदार मुकेशकुमार मिना याने तीन लाख रूपयांची मागणी केली होती.

तिसरा आरोपी फरार : आरपीएफ ठाणेदार आणि एका खासगी व्यक्तीला मदत करणारा तिसरा आरोपी सय्यद मुजमिर हा घटनेनंतर फरार झाला आहे. त्याचा शोध सीबीआय घेत आहे. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा : Thane Crime : भिवंडीतुन दुचाक्या लंपास करून जळगावात करत होता विक्री; सराईत चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.