ETV Bharat / state

अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी; सध्या ICU मध्ये दाखल

रेखा ठाकूर यांनी अॅड प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटले आहे, की अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीने बायपास सर्जरी कऱण्यात आली आहे. त्यांना सध्या आसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी
प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी
author img

By

Published : Jul 9, 2021, 12:54 PM IST

Updated : Jul 9, 2021, 1:10 PM IST

अकोला - राज्यात 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीच्या जागांसाठी पोटनिवडणूक होत आहे. जिल्हा परिषदेत वंचित बहुजन आघाडीचे वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी तीन महिने पक्ष कार्यापासून दूर राहणार असल्याचे सांगितले होते. त्या मागचे कारण आता समोर आले आहे. प्रकाश आंबेडकर यांच्यावर आंबेडकर यांच्यावर 8 जुलै रोजी तातडीने बायपास सर्जरी करण्यात आली आहे. ते सध्या ICU मध्ये असल्याची माहिती पक्षाच्या प्रभारी अध्यक्षा रेखा ठाकूर यांनी दिली.

रेखा ठाकूर यांनी अॅड प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीबाबत माहिती देताना म्हटले आहे, की अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर गुरुवारी तातडीने बायपास सर्जरी कऱण्यात आली आहे. त्यांना सध्या आसीयूमध्ये हलविण्यात आले आहे. तसेच त्यांची प्रकृती स्थिर असून काळजीचे कारण नाही असे डॉक्टरानीं कळविले आहे. अजून काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात येईल, तसेच त्याच्या प्रकृतीची दैनदिन माहिती त्यांच्या फेसबूक पेजवरून देण्यात येईल असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी
प्रकाश आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी

सध्या पाच जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य सस्थांच्या निवडणुका आहेत. मात्र त्यांच्या प्रकृतीच्या कारणामुळे आंबेडकर यांनी प्रचारासाठी उपस्थित राहणार नसल्याचे सांगितले होते. तसेच पक्षाचे काम थांबू नये म्हणून प्रभारी प्रदेशाध्यक्ष म्हणून रेखा ठाकूर यांची नियुक्ती केली होती.

वंचित बहुजन आघाडी पक्षाचा राजकीय गढ अकोला जिल्हा आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती वंचित बहुजन आघाडीच्या ताब्यात आहेत. त्यासोबतच आता 14 जिल्हा परिषद आणि 28 पंचायत समितीच्या जागांची पोटनिवडणुक होत आहे. ही निवडणूक वंचितसाठी महत्त्वाची आहे.

आंबेडकर यांच्यावर बायपास सर्जरी

Last Updated : Jul 9, 2021, 1:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.