ETV Bharat / state

Bhavna Gawali Support : विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - Thackeray group

रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री खासदार भावना गवळी ( ( MP Bhavna Gawli ) ) यांना पाहून 'गद्दार, गद्दार, पन्नास खोके' असे म्हणत त्यांना डीवचण्याचा प्रयत्न ठाकरे गटाच्या ( Thackeray group ) कार्यकर्त्यांनी केला होता. त्याविरोधात शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज दुपारी दहन ( Burning of symbolic effigy of Vinayak Raut ) केले.

Bhavna Gawali Support
Bhavna Gawali Support
author img

By

Published : Nov 23, 2022, 7:36 PM IST

अकोला - रेल्वे स्थानकावर मंगळवारी रात्री घडलेल्या प्रकाराच्या विरोधामध्ये शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे आज दुपारी दहन ( Burning of symbolic effigy of Vinayak Raut ) केले. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार राउत यांच्या विरोधात जोरदार नारेबाजी ( Strong slogans against MP Raut ) केली. तर खासदार गवळी ( MP Bhavna Gawli ) यांच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. मदनलाल धिंग्रा चौकात हे आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता.

विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

खासदार गवळींना डीवचण्याचा प्रयत्न - अकोला रेल्वे स्थानक येथून खासदार भावना गवळी या मंगळवारी रात्री मुंबईकडे रेल्वेने जाण्यासाठी आल्या होत्या. त्याचवेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ( Thackeray group ) खासदार विनायक राऊत, आमदार नितीन देशमुख यांच्यासोबत शेकडो कार्यकर्ते रेल्वे स्थानकावर आले होते. त्यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार गवळी यांना पाहून 'गद्दार, गद्दार आणि पन्नास खोके' असे म्हणत त्यांना डीवचण्याचा प्रयत्न केला.

खासदार राऊत यांच्या विरोधात आंदोलन- परिणामी, या घटनेचा निषेध म्हणून माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाध्यक्ष विठ्ठल सरप, अश्विन नवले, योगेश अग्रवाल यांच्या नेतृत्वामध्ये खासदार गवळी यांच्या समर्थनार्थ आणि खासदार राऊत यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. यावेळी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी खासदार विनायक राउत यांच्या विरोधात जोरदार नारबाजी करीत त्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त होता.

खासदार गवळी यांची जीआरपी पोलीस ठाण्यात तक्रार - दरम्यान, अकोला रेल्वे स्थानकावर घडलेल्या प्रकाराच्या संदर्भामध्ये खासदार भावना गवळी यांनी अकोला रेल्वे पोलीस विभागाकडे लिखित तक्रार दाखल केली आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते हे अंगावर आले असल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे. तसेच विरोधात नारबाजी केली असल्याचेही त्यांनी तक्रारीत आरोप केला असल्याची माहिती जीआरपी पोलीस निरीक्षक अर्चना गाढवे यांनी 'इटीव्ही भारत'ला दिली.

पुन्हा असा जर प्रकार केला तर ...छत्रपती शिवाजी महाराज व बाळासाहेब ठाकरे यांचे विचार विसरून महिलांचा अपमान करणाऱ्या या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटांच्या कार्यकर्त्यांचा निषेध करतो. पुन्हा असा जर प्रकार केला तर शिंदें साहेबांच्या खऱ्या शिवसैनिकाशी आहे, असा इशारा जिल्हाध्यक्ष अश्विन नवले यांनी यावेळी दिला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.