अकोला: पातुर तालुक्यातील पहाडशिंगी येथील शेतातील विहिरीमध्ये एका चिमुकल्यासह महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपासून ही महिला मुलासह बेपत्ता असल्याची तक्रार चान्नी पोलीस स्टेशन Channi Police Station येथे दाखल असल्याचे समजत आहे. दरम्यान या घटनेमुळे पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवली आहेत.
चान्नी पोलिसात दाखल करण्यात आली पातुर तालुक्यातील पहाडशिंगी येथे शेतातील विहिरीत एक महिला आपल्या चिमुकल्या बाळासह मृत मिळून आली आहे. चान्नी पोलिसांनी मिळालेल्या माहितीवरून घटनास्थळी धाव घेत विहिरीतील महिला व चिमुकल्याला बाहेर काढले आहे. गोकुळा प्रदीप लटके (वय 28 वर्षे) तर वीर प्रदीप लटके (वय एक वर्ष) असे या मृतकांची नावे आहेत. ही महिला 17 ऑक्टोबरपासून बेपत्ता असल्याचे तक्रार चान्नी पोलिसात दाखल करण्यात आली होती.
नेमके कारण अद्याप अस्पष्ट नातेवाईकांनी महिलेचा शोध घेत असताना त्या महिलेच्या शेताजवळील विहिरीजवळ महिलेच्या चपला नागरिकांना दिसले. त्यावरून त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता. ती महिला व बाळ हे विहिरीच्या पाण्यात तरंगताना दिसून आले. त्यांनी तातडीने चान्नी पोलिसांना या संदर्भात माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत या दोघांचेही मृतदेह विहिरीबाहेर काढले आहे. या घटनेमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा तपास करत आहे. या घटनेसंदर्भामध्ये पोलिसांनी प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याचे सांगितले आहे. मात्र, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास करण्यात येत असल्याचे पोलीस निरीक्षक यांनी सांगितले आहे.