अकोला - अजित पवारांनी सामान्य भाविकांशी चर्चा करावी आणि त्यांच्यात काय घालमेल सुरू आहे, ते पाहावे. अजित पवारांना फक्त पैसा कळतो, असा घणाघाती आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
राऊतांना अमेरिकेची निवडणूक लढवायची आहे -पाटील
शासकीय विश्रामगृह येथे ते आले असता चंद्रकांत पाटील पत्रकरांशी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, की संजय राऊतांनी माझ्यावर लक्ष देण्याची गरज नाही. कारण संजय राऊत यांना भरपूर कामे आहेत. त्यांना अमेरिकेची निवडणूक लढवायची आहे, असा टोला भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावला.
जुन्या प्रकरणांची चौकशी केली तरी परबांना राजीनामा द्यावा लागेल -
अनिल परब यांचे वरील नवीन घोटाळे भाजपने काढण्याआधी, जुने घोटाळे तर निकाली लागू द्या. मंत्र्यांवर मोठ्या प्रमाणात आरोप होत असताना, हे राज्य कसे चालवू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत पाटील म्हणाले की याबाबत नव्याने आरोप करण्याची गरज नाही. जुन्या प्रकरणाची चौकशी जरी केली तरी अनिल परब यांना राजीनामा द्यावा लागेल, असा चिमटा त्यांनी अनिल परब यांना घेतला.
हे ही वाचा - ड्रग्ज प्रकरण : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग हैदराबादेत ईडी कार्यालयात हजर, पाहा व्हिडिओ
आता निवडणूक स्वबळावर -
निवडणूक लढण्यासंदर्भात आम्हाला आता कार्यकर्त्यांना द्विधा मनस्थितीत ठेवायचे नाही. निवडणूक लढवायची की नाही. आता निवडणूक लढायची आणि स्वबळावर लढायची, अस चंद्रकांत पाटील यांनी पुन्हा स्पष्ट केले आहे.
हे ही वाचा - मारुतीने परत मागविली 'या' मॉडेलची 1 लाख 81 हजार वाहने; सदोष पार्ट बदलून देणार
लोकांना अजून किती दिवस घरात कोंडून ठेवणार ?
कोरोनाची तिसरी लाट येणार, असं सरकार म्हणत आहे. पहिला रुग्ण सापडून दीड वर्ष झाले. दोन व्हॅक्सिननंतर कोरोनाचे स्वरूप बदलले आहे. त्यामुळे लोकांना किती दिवस घरात कोंडून ठेवणार, असा सवालही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. यावेळी भाजपचे सरचिटणीस संजय कुटे, महापौर अर्चना मसने, आमदार रणधीर सावरकर, भाजप शहराध्यक्ष विजय अग्रवाल व इतर पदाधिकारी उपस्थित होते.