ETV Bharat / state

शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाजप आमदारांनी यावे - सेनेच्या आमदारांची गुगली - Sena MLA Nitin Deshmukh request

शेतकऱ्यांना जर वीज मिळत नसेल तर पश्चिम विदर्भातील भाजप आमदारांनी ( BJP MLA from West Vidarbha ) एकत्र यावे असे, आवाहन शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh ) यांनी केले आहे. महावितरणचा निर्णय पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ असा भेद करणारा आहे असे देशमुश म्हणाले.

शेतकऱ्यांच्या आंदोलनात भाजप आमदारांनी यावे

author img

By

Published : Jan 4, 2023, 7:42 PM IST

अकोला - पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांना रात्रीची विज देण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांना कडाक्याच्या थंडीत रात्री पिकांना पाणी द्यावे लागत आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांचे पूर्व विदर्भावर प्रेम असल्याने त्या भागात शेतकऱ्यांना दिवसभर वीज दिल्या जाते. अकोल्याचे पालकत्व स्वीकारलेल्या उपमुख्यमंत्री फडणवीस ( Akola Guardian Minister Devendra Fadnavis ) यांनी पश्चिम विदर्भात दिवसभर वीज देऊन पश्चिम विदर्भाप्रति आपले प्रेम दाखवावे.

शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हा - फडणवीसांकडून हे होत नसेल तर पश्चिम विदर्भातील भाजप आमदारांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर एकत्र येऊन उद्धव बाळासाहेब ठाकरे ( Uddhav Balasaheb Thackeray ) यांच्या शिवसेनेच्या वतीने काढण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांच्या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करीत शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh ) यांनी आज गुगली टाकून भाजपच्या आमदारांना एकप्रकारे आव्हानच दिले आहे.

पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ असा भेद - त्यांच्या पक्ष कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, सरकार 'महावितरण'च्या एका वादग्रस्त निर्णयासंदर्भातील सरकारने घेतलेला निर्णय पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भ असा भेद करणारा आहे. सध्या रब्बीचा हंगाम सुरू आहे. रब्बी पिकांसाठी सध्या मोठ्या प्रमाणात सिंचनाची आवश्यकता आहे. मात्र, 'महावितरण'नं पश्चिम, पुर्व विदर्भासाठी विजेची उपलब्धता यासोबतच वेळापत्रकात मोठा भेदभाव केला आहे.

१६ जानेवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा - या निर्णयाणे ठाकरे शिवसेना आक्रमक झाली असून सरकारने हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. यासाठी अकोला जिल्ह्यात येत्या १६ जानेवारीला शेतकऱ्यांचा 'मोर्चा' महावितरण कार्यालयावर शिवसेनेच्या नेतृत्वात हा मोर्चा धड़कणार आहे अशी, माहिती शिवसेना आमदार नितिन देशमुख यांनी अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच भाजप आमदारांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असं आवाहन देशमुखांनी केलं आहे.

रात्रीचा वीजपुरवठा शेतकऱ्यांसाठी जीवघेणा - सध्या पश्चिम विदर्भात अनेक भागात रात्रीची थंडी पडलेली आहे. शेतकरी थंडीत शेकोटी करून लाईट केव्हा येते याची वाट पाहतात. त्यात लाइट आल्यानंतर शेतकरी जीवमुठीत घेऊन पिकांना पाणी देत असल्याचे वास्तव आहे. एकीकडे खरिपात अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना रब्बीतून दिलासा मिळेल अशी आशा होती. मात्र, महावितरणच्या वीजपुरवठ्याबाबतचे वेळापत्रक शेतकऱ्यांच्या जीवावर बेतले आहे.

पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवर अन्याय - पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांप्रमाणे पश्चिम विदर्भातील सहा जिल्ह्यात सुद्धा १२ तास ३ फेज कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा द्यावा. गेल्या वर्षीसुद्धा पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांनाच हा बारा तास ३ फेज वीजपुरवठा करण्यात आला. यावेळी तसेच आदेश शासनानं वीज मंडळांना दिले आहेत. त्यामुळे पश्चिम विदर्भातील शेतकऱ्यांवरील हा अन्याय शासनाने दूर करावा, असे आमदार देशमुख म्हणाले.

महावितरणावर धडकणार शेतकऱ्यांचा मोर्चा - पश्चिम विदर्भासाठी हा भेदभाव का केला जातो. एकीकडे अकोल्यातील आकोट, पातुर हा डोंगर भाग असून या सहा जिल्ह्यातील अनेक भागात रात्रीचा वीज पुरवठा केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी कठीण परिश्रम घ्यावे लागत आहे. दरम्यान अकोल्यात दोन शेतकऱ्यांना रात्री पिकाला पाणी देत असताना सर्पदंश झाला आहे. त्यामुळे शासनाने पश्चिम विदर्भात दिवसाला १२ तास वीज पुरवठा करावा, या मागणीसाठी येत्या १६ जानेवारीला शेतकऱ्यांचा मोर्चा महावितरण कार्यालयावर धडकणार आहे. या मोर्चामध्ये जिल्ह्यातील दहा हजार शेतकरी सहभागी होणार आहेत. सिव्हिल लाईन ते दुर्गा चौक परिसरात महावितरण कार्यालयपर्यत मोर्चा राहणार आहे. आंदोलनस्थळी शेतकऱ्यांच्या मागण्यांचा तोडगा न निघाल्यास निर्णय होईपर्यत शिवसेना आणि शेतकरी रस्त्यावर तसेच महावितरण कार्यालयात ठिय्या देणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.