अकोला - तालुक्यातील पर्यटनस्थळ म्हणुन प्रख्यात असलेले भंडारदरा धरण यावर्षी 3 ऑगस्ट रोजीच तांत्रिक दृष्ट्या भरले आहे. शेंडी गावचे भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोकराव भांगरे यांच्या हस्ते या धरणाची विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी, जलपूजन करत प्रवरामाईला गोड प्रसाद चढवत साडीचोळी अर्पण केली गेली.
ब्रिटीशकालीन भंडारदरा धरण गेल्या 93 वर्षापासुन थाटात उभे आहे. या धरणावर आज हजारो आदिवासी बांधवांचे रोजगार अवलंबून आहेत. त्यामुळे या भंडारदरा धरणाचेही आपण काहीतरी देणे लागतो. हे लक्षात घेऊन, हे धरण ज्या नदीवर बांधलेले आहे त्या प्रवरा माईच्या पाण्याची विधिवत जलपूजा करत साडीचोळी अर्पण केली.