ETV Bharat / state

केंद्र सरकार ही कलंकशाहीची औलाद; बच्चू कडूंचा घणाघात - narendra modi news

देशात 43 लाख टन तुरीची आवश्यकता आहे. वर्षभर पुरेल एवढी डाळ आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच यंदाच्या वर्षी भारतात 38 लाख टन डाळ उत्पादन होईल. सध्या सरकारने 8 ते 9 लाख टन डाळ मोझांबीक या देशातून आयात केली आहे.

बच्चू कडू
बच्चू कडू
author img

By

Published : Jun 5, 2021, 10:05 AM IST

Updated : Jun 5, 2021, 10:47 AM IST

अकोला - मोदीजी नेहमी म्हणतात 'मेक इन इंडिया. मेड इन इंडिया' हे ब्रीदवाक्य शेती उत्पादनात का वापरत नाही. हे फक्त अंबानी, अडाणीसाठीच वापरता का? ही नालायकी आहे. सरळ सरळ महात्मा फुले यांच्या म्हणण्यानुसार कलंकशाहीची औलाद आहे, असा घणाघात राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केला आहे. सरकारने तूरच नाही तर मूंग, उडीद डाळ आयात केली आहे. शेतकऱ्यांवर याचा परिणाम होणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले.

बच्चू कडूंचा केंद्र सरकारवर घणाघात

केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणामुळे शेतकऱ्यांवर परिणाम

देशात 43 लाख टन तुरीची आवश्यकता आहे. वर्षभर पुरेल एवढी डाळ आपल्याकडे उपलब्ध आहे. तसेच यंदाच्या वर्षी भारतात 38 लाख टन डाळ उत्पादन होईल. सध्या सरकारने 8 ते 9 लाख टन डाळ मोझांबीक या देशातून आयात केली आहे. गरज नसताना बाहेरील देशातून तूरडाळीची आयात केली जाते. जर आयात केली नसती तर तुरीचे भाव दहा हजाराच्या जवळ असते. पेरणीच्यावेळी शेतीमालाचे भाव वाढत असतात. परंतु, यावर्षी भाव कमी होत आहे. यावर्षी उलट होत असताना दिसत आहे. याचा परिणाम केंद्र सरकारने घेतलेल्या धोरणामुळे असल्याचा आरोप बच्चू कडू यांनी केला आहे.

तूर दाळ उत्पादन

Last Updated : Jun 5, 2021, 10:47 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.