अकोला - अकोट तालुक्यातील पोपटखेड खटकाली मार्गावरील डोहात आज दुपारी एक युवक हा अंघोळीसाठी उतरला होता. परंतु, तो बाहेर न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी या डोहात उडी घेऊन नागरिकांच्या मदतीने त्याला बाहेर काढले. राम झापर्डे असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे.
पोपटखेड खटकाली मार्गावरील डोहात राम झापर्डे हा अंघोळीसाठी उतरला होता. परंतु, तो बाहेर न आल्याने त्याचा शोध घेण्यात आला. परिसरातील नागरिकांनी ही माहिती अकोट ग्रामीण पोलीस ठाण्यात दिली. घटनास्थळ चिखलदरा येत असल्याने येथे पोलिसांना यायला सायंकाळ होणार होती. त्यानंतर त्याचा शोध हा दुसऱ्या दिवशी सकाळी सुरू झाला असता. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या मदतीने अकोट ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांनी या डोहात उडी घेतली. तासाभरानंतर राम झापर्डे याचा मृतदेह हाती लागला. त्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. अकोट ग्रामीण पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेने कौतुक होत आहे.