अकोला - महात्मा गांधीजी बद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कालीचरण महाराजाविरुद्ध आता एका महिलेने तक्रार दिली ( Women Complaint Kalicharan Maharaj ) आहे. हा महाराज ढोंगी आहे. त्याने पैशांनी फसवणूक केली आहे, अशी तक्रार महिलेने रायपूर पोलीस ठाण्यात केली ( Women Complaint Raipur Police ) होती. मात्र, हे प्रकरण आता अकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले. याप्रकरणी जुने शहर पोलिसांनी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग आणि ईश्वरनंद महाराज उर्फ ईश्वर गोजे या दोघांना नोटीस पाठवून हजर राहण्यास सांगितले ( Akola Police Send Notice Kalicharan Maharaj ) आहे.
अकोल्यातील एका महिलेने ईश्वरानंद महाराज उर्फ ईश्वर गोजे याच्या माध्यमातून साधना प्राप्त करण्यासाठी व वैयक्तिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी कालीचरण महाराज उर्फ अभिजीत धनंजय सराग यांची दिल्लीत भेट घेतली. कालीचरण महाराजासोबत तिचे निकटचे संबंध जुळले. कालीचरण महाराज यांनी समस्या निराकरण करण्यासाठी पैशांची मागणी केली. त्या महिलेने पेटीएमच्या माध्यमातून कालीचरण महाराज यांना आधी पाच हजार नंतर 25 हजार असे बरेच वेळा पैसे पाठविले आहे.
मात्र, त्या महिलेला माहिती मिळाली की, कालीचरण महाराज हा संत नसून खोटे महाराज आहे. त्याला कोणतीच सिद्धी प्राप्त झालेली नाही. म्हणून त्या महिलेने या संदर्भात रायपूर पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतू, रायपूर पोलिसांनी घटनास्थळ हे असल्याने प्रकरण अकोला पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. अकोला पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणाचा तपास जुनेशहर पोलिसांकडे सुपूर्द केला आहे.