अकोला - एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे दिलासादायक बाब म्हणजे या रुग्णांमध्ये सुधारणा होण्याचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मंगळवारी 23 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे ही संख्या आता 167 वर पोहोचली आहे. ही संख्या अॅक्टिव्ह रुग्णांच्या संख्येपेक्षा 55 ने जास्त आहे. त्यामुळे हा सुखद धक्का आहे.
कोरोना रुग्णांची संख्या 299 झाली आहे. तर यामधून आतापर्यंत 167 रुग्णांनी या विषाणूवर विजय मिळवला आहे. त्यामध्ये 23 रुग्ण बरे झाले. तर 18 मे रोजी चार, 17 मे रोजी 17, 15 मे रोजी 28, 14 मे रोजी 12 आणि 13 मे रोजी 41 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, ही संख्या सर्वांना दिलासा देणारी आहे.
यामुळे रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यासोबतच रुग्ण संख्या जरी वाढत असली तरी बरी होण्याची संख्याही वाढत असल्याने सध्या अॅक्टिव्ह रुग्ण 112 आहेत. ग्रामीण भागापेक्षा अकोला शहरात ही संख्या जास्त आहे. तर सात पोलीस कर्मचारी बाधित झालेले आहेत. त्यामुळे पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
सद्यस्थिती
एकूण पॉझिटिव्ह अहवाल-२९९
मृत-२०(१९+१)
डिस्चार्ज-१६७
दाखल रुग्ण (अॅक्टिव्ह पॉझिटिव्ह)-११२