अकोला - शेतकऱ्यांसंर्भात महत्वाचे विषय बैठकीत असताना जिल्हा उपनिबंधक कार्यालयाचे प्रमुख अधिकारी बैठकीला अनुपस्थित होते. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दांडी मारणाऱ्या अधिकाऱयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. शनिवारी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला उपनिबंधक कार्यालयाचे वरिष्ठ लिपीक प्रतिनिधी म्हणून उपस्थित होते.
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. बैठकीत अनुपस्थिती असल्याने कारणे दाखवा नोटीस पाठवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. पावसाळी अधिवेशनच्या पूर्वी पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी महत्वपूर्ण आढावा बैठक घेतली. या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष्य प्रसाद, पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्यासह सर्व विभागाचे विभाग प्रमुख उपस्थित होते.
सध्या खरीप पेरणीचे दिवस असल्याने शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांना प्राधान्य द्या; असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी अधिकाऱ्यांना दिले. यावेळी पाणी टंचाई, चार टंचाई, एक कोटी ३३ लाख दुष्काळ मदत म्हणून शेतकऱ्यांना वाटप तसेच ६२ कोटीची शासनाकडे मागणी करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
ज्या शेतकऱ्यांना बँकेने मदत दिली त्या संदर्भात प्रमाणपत्र दाखल कारणाचे निर्देश, अकोट-पातूर शेवटच्या टप्यात दुष्काळ मध्ये जाहीर केल्याने त्यांना देण्यात येणाऱ्या मदतीबाबत, विहीर अधिग्रहण, शहर पाणी पुरवठा, ग्रामीण पाणी पुरवठा प्रश्न, आपत्ती व्यवस्थापनासाठी नियंत्रण कक्ष स्थापन करा, इत्यादी विषयांबाबतही अधिकाऱ्यांना निर्देश दिले.