ETV Bharat / state

अकोला: बैलजोडी चोरणाऱ्या बाप-लेकासह कसायाला गुन्हे शाखेकडून अटक - oxes theft case

बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव खुर्द येथे राहणारे अतुल सरदार यांनी 13 सप्टेंबर 2020 रोजी बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून पळसो बढे येथील गजानन डाबेराव याला ताब्यात घेतले.

अटकेतील आरोपीसह पोलीस
अटकेतील आरोपीसह पोलीस
author img

By

Published : Feb 9, 2021, 10:10 PM IST

Updated : Feb 9, 2021, 10:15 PM IST

अकोला - बैलजोडी चोरी प्रकरणात संशयित म्हणून ताब्यात घेतलेल्या व्यक्तीने मुलासोबत 12 ठिकाणी बैलजोडी चोरी केल्याची कबुली स्थानिक गुन्हे शाखेला आज दिली. पोलिसांनी यामध्ये चोरीची बैलजोडी खरेदी करणाऱ्या कसायाला अटक केली आहे. गजानन डाबेराव व त्याचा मुलगा विक्की डाबेराव, एक अल्पवयीन मुलगा आणि कसाई शेख सद्दाम शेख गणी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत.

बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोरेगाव खुर्द येथे राहणारे अतुल सरदार यांनी 13 सप्टेंबर 2020 रोजी बैलजोडी चोरी गेल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर स्थानिक गुन्हे शाखेने संशयित म्हणून पळसो बढे येथील गजानन डाबेराव याला ताब्यात घेतले. त्याने चौकशीमध्ये गुन्ह्याची कबुली दिली आहे. मुलगा विक्की डाबेराव व एक अल्पवयीन मुलासोबत ही चोरी केल्याचे त्याने पोलिसांना कबुलीत सांगितले. पोलिसांनी यामध्ये त्याचा मुलगा विक्की व अल्पवयीन मुलगा यांना ताब्यात घेतले.

बैलजोडी चोरणाऱ्या आरोपींना अटक

चार लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

आरोपीने चोरलेल्या बैलजोडी या बोरगाव मंजू येथील शेख सद्दाम शेख गणी या कसायाला विकल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने त्यालाही अटक केली. त्याची चौकशी केली असता त्याने विकत घेतलेले बैलांची कत्तल करून त्याचे मांस विकल्याचे सांगितले. स्थानिक गुन्हे शाखेने या तिघांना अटक केली आहे. त्यांच्याजवळून चार लाख 43 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. पुढील कारवाईसाठी आरोपींना बोरगाव मंजू पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.

12 ठिकाणी बैलांची चोरी
गजानन डाबेराव याने त्याच्या चौकशीत 12 ठिकाणी बैलजोडी चोरी केल्याची कबुली दिली आहे. दहा चोरी या बोरगाव मंजू पोलिस स्टेशन हद्दीत तर एक मूर्तिजापूर आणि नंतर एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या हद्दीत केल्याची कबुली त्याने दिली आहे. मिळालेल्या पैशातून घर बांधकाम करून दुचाकी घेतल्याचे आरोपी गजानन डाबेराव याने सांगितले. तसेच दोन नवीन बैलजोड्या घेतल्याची कबुली पोलिसांना दिली.

Last Updated : Feb 9, 2021, 10:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.