ETV Bharat / state

Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार - शरद पवार - Sharad Pawar

Sharad Pawar on Ajit Pawar : अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलाय. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

Sharad Pawar on Ajit Pawar
Sharad Pawar on Ajit Pawar
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 12, 2023, 2:37 PM IST

अकोला Sharad Pawar on Ajit Pawar - सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी एका कार्यक्रमानंतर त्यांची पत्रकार परिषद झाली. त्यावेळी शरद पवारांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली. अजित पवार यांना शरद पवारांचही समर्थन आहे, या चर्चेच्या अनुषंगानं सुरुवातीलाच प्रश्न विचारण्यात आला. अजित पवारांनी मांडलेल्या सवत्या सुभ्याविषयी विचारल्यावर पवार यांनी एक गोष्ट स्पष्ट केली. ते म्हणाले की, माझ्या विरोधात सुप्रीम कोर्टात गेले, त्यांना मी पाठिंबा कसा देईन? भाजपाच्या नादाला लागलेल्या कुणालाही आपला पाठिंबा नाही असं पवारांनी यावेळी स्पष्ट केलं.

अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच - अजित पवार यांना मुख्यमंत्रिपद देणार अशी चर्चा ते भाजपाच्या वळचणीला गेल्यावर बोलली जात होती. आता तीन महिने उलटले तरी त्यामध्ये काही प्रगती होताना दिसत नाही. यावर विचारलं असता शरद पवार म्हणाले की, अजित पवार मुख्यमंत्री होणार हे स्वप्नच राहणार आहे. मविआची सत्ता यावी यासाठी आमचे प्रयत्न आहेत. भाजपा विरोधात एकत्र येणाऱ्यांना सोबत घेण्याची आमची भूमिका आहे, असं स्पष्ट करतानाच भाजपासोबत जाण्याची माझी कधीच भूमिका नव्हती असं पवार म्हणाले.

अजित पवार गटाला माझा कसा पाठिंबा असू शकतो - शरद पवार यांच्यापासून फुटून गेलेल्याच्याबद्दल त्यांनी या सगळ्यांनी आपली फसवणूक केल्याच्या आशयाचं मत मांडलं. जे गेले ते कोणत्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आले होते. राष्ट्रवादीचं चिन्ह वापरलेल्या अजित पवार गटाला माझा कसा पाठिंबा असू शकतो. राष्ट्रवादीमधून भुजबळ निवडून आले आणि भाजपात गेले. पवार पुढे म्हणाले की, खोटं बोलून छगन भुजबळ शपथविधीला गेले, हे त्यांनीच कबुल केलं आहे. आमच्या चेहऱ्यावर हे निवडून आले आणि भाजपात गेले त्यांना काय म्हणणार, अशी उद्विग्न प्रतिक्रिया पवारांनी दिली.

भाजपातही बजबजपुरी - आगामी निवडणुकीत अजित पवारांना लोक स्वीकारतील का या प्रश्नावर शरद पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं. उलट त्यांनी पत्रकारांनाच प्रश्न विचारला की, आता तुम्हीच सांगा. या उत्तरामुळं पत्रकारांचं समाधान झालं नाही. पुन्हा-पुन्हा विचारल्यावरही ते म्हणाले की, तुम्हीच सांगा. कंत्राटी भरतीच्या मुद्यावर इतर सहकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचं शरद पवार म्हणाले. केरळ, पंजाब कर्नाटकात भाजपाची सत्ता नाही. इतर राज्यंही त्यांच्याकडून निसटतील असा आशावाद पवारांनी मांडला. भाजपातही बजबजपुरी आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना स्थान किती, ते निवडणुकीत समजलं, असा टोलाही पवारांनी लगावला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.