अकोला - अकोल्यात आज(रविवारी) सकाळी प्राप्त तपासणी अहवालानुसार पाच पुरुष आणि एक महिला अशा सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे. तर, एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. आज प्राप्त १०२ तपासणी अहवालांपैकी ९६ अहवाल हे निगेटिव्ह आले आहेत. तर, ६ अहवाल हे पॉझिटिव्ह आहेत.
अकोल्यात आज सहा कोरोनाबाधित आढळले आहेत. या पॉझिटिव्ह आढळलेल्या रुगणांपैकी पाच पुरुष व एक महिला आहे. हे रुग्ण मोहम्मद अली रोड, रामनगर सिव्हिल लाईन्स, तारफैल भवानी पेठ, दगडीपूल जुने शहर व गवळीपूरा येथील रहिवासी आहेत. दरम्यान, आज सकाळी एका ५० वर्षीय महिलेचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे. ही महिला खैर मोहम्मद प्लॉट येथील रहिवासी होती. ती ७ मे रोजी उपचारार्थ दाखल झाली होती.
आज प्राप्त अहवाल - १०२
पॉझिटिव्ह - ०६
निगेटीव्ह - ९६
जिल्ह्यातील सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - १५३
मृत - (१२+१) = १३
डिस्चार्ज - १४
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह) - १२६