अकोला - जिल्ह्यात आज (गुरुवारी) 46 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर दुपारी दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
गुरुवारी प्राप्त झालेल्या 46 अहवालात 19 महिला व 27 पुरुष आहेत. त्यातील 11 जण खदान येथील, सिटी कोतवाली तेथील नऊ जण, अकोट फैल येथील पाच जण, तारफैल येथील चार जण, न्यू तापडीया नगर येथील दोन, लकडगंज माळीपुरा येथील दोन जण तर जठारपेठ, इराणीवस्ती जुनेशहर, फिरदौस कॉलनी, श्रेयानगर खडकी, गुलशन कॉलनी, जीएमसी क्वार्टर, वाडेगाव बाळापूर, देशमुख फैल, सोनटक्के प्लॉट, दिवेकर चौक, शास्त्रीनगर, टॉवर चौक, मोहतामिल गोरक्षण जवळ येथील प्रत्येकी एक जण रहिवासी आहेत.
दुपारनंतर दहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. त्यातील सात जणांना घरी सोडण्यात आले तर उर्वरित तीन जणांना संस्थागत अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. त्यात तीन महिला व सात पुरुष आहेत. हे रुग्ण महसूल कॉलनी येथील तीन, रामदास पेठ येथील दोन, न्यु राधाकिसन प्लॉट येथील दोन , तर तोष्णीवाल ले आऊट, कौलखेड, आदर्श कॉलनी येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहे,अशी माहिती शासकिय वैद्यकीय महाविद्यालयाच्या सूत्रांनी दिली.
दरम्यान, अहवालात पॉझिटीव्ह आलेला रुग्ण हा यापुर्वी कोवीड केअर सेंटरमधून सुट्टी झाल्यानंतर पुन्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चाचणीसाठी आला होता. त्याने यावेळी आपले नाव वेगळे सांगितले होते. विशेष म्हणजे, हा रुग्ण पॉझिटिव्ह असताना त्याला सुटी कशी देण्यात आली? हाच प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आरोग्य विभाग किती गंभीर आहे, हे सिद्ध होते. हा रुग्ण देशमुख फैल येथिल रहिवासी आहे. तर तो घरी गेल्यानंतर त्याने किती जणांना बाधित केले, हा शोध तातडीने घेणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे त्यास नवीन रुग्ण म्हणून नमूद न करता एकूण पॉझिटीव्ह अहवाल संख्या 712 करण्यात आली आहे, असे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने कळविले आहे.
प्राप्त अहवाल - 193
पॉझिटीव्ह - 46
निगेटीव्ह - 147
आता सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल - 712
मृत - 34
डिस्चार्ज - 488
दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह) - 190