अकोला - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून परिस्थिती आणखी गंभीर होत चालली आहे. आज सकाळी चाचणीसाठी पाठवलेले १७९ अहवाल प्राप्त झाले. त्यामध्ये 148 निगेटिव्ह आहेत, तर 31 पॉझिटीव्ह आहेत. त्यात 12 महिला व 19 पुरुष रुग्ण आहेत, तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
पॉझिटव्ह रुग्णांमध्ये 8 जण हरिहरपेठ येथील, 6 जण डाबकी रोड येथील, आदर्श कॉलनी येथील 3, सिंधी कॅम्प येथील 2, तर उर्वरीत बाळापूर, अण्णाभाऊ साठे नगर, श्रीवास्तव चौक, भीमनगर, गंगानगर, पातूर, काळवाडी, अकोट फैल, तारफैल, देशमुख फैल, लक्ष्मीनगर, केंद्र खुर्द येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.
दरम्यान, आज दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यात एक केंद्र खुर्द जि. हिंगोली येथील 21 वर्षीय महिलेचा समावेश असून ही महिला 22 जूनला दाखल झाली होती. तिचा बुधवारी 24 जूनला रात्री मृत्यू झाला. संबधित अहवाल आज पॉझिटीव्ह आला आहे. अन्य एक 50 वर्षीय पुरुष रुग्ण बाळापूर तालुक्यातील खामखेड येथील रहिवासी आहेत. हा रुग्ण 15 जूनला दाखल झाला होता. त्याचा काल रात्री मृत्यू झाला.
जिल्ह्यात एकूण 1 हजार 340 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये 73 जणांचा मृत्यू झाला आहे, तर 905 जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर सध्या 362 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.