अकोला - जिल्ह्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंता वाढवणारी आहे. बाधित रुग्ण उपचारानंतर बरे होणाऱ्यांची संख्यादेखील वाढली आहे. कोरोनातून बरे झालेल्या 28 रुग्णांना गुरुवारी रात्री घरी सोडण्यात आले आहे. तर आज शुक्रवारी एक पॉझिटीव्ह रुग्ण सापडला आहे.
तपासणीसाठी पाठवलेल्या ९६ अहवालापैकी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. हा 35 वर्षीय युवक खडकी येथील निसर्ग सोसायटीत राहतो. इतर 95 अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यासोबतच गुरुवारी रात्री २८ जणांना रुग्णालयातून सोडण्यात आले. त्यातील चार जणांना घरी पाठवले आहे. तर उर्वरित २४ जणांना कोविड केअर सेंटर येथे पुढील १४ दिवस ठेवण्यात येणार आहे.
जिल्ह्यात कोरोनाची सद्यस्थिती -
एकूण पॉझिटिव्ह अहवाल- २०८
मृत - १५(१४+१)
डिस्चार्ज- १००
दाखल रुग्ण(ऍक्टिव्ह पॉझिटिव्ह) - ९३