ETV Bharat / state

अकोला जिल्ह्यात 26 नवे कोरोनाग्रस्त; एकाचा उपचारादरम्यान मृत्यू - अकोला कोरोना बातमी

कोरोना तपासणी अहवालात आज (दि. 15 जुुुलै) सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

akola hospital
शासकीय रुग्णालय अकोला
author img

By

Published : Jul 15, 2020, 12:47 PM IST

अकोला - कोरोना तपासणी अहवालात आज (दि. 15 जुुुलै) सकाळी २६ जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. २१६ जणांची तपासणी करण्यात आली होती. त्यामधून हा निकाल समोर आला आहे.

प्राप्त अहवालात २६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात ११ पुरुष व १५ महिला आहेत. त्यात अकोट येथील सात जण, अकोली जहागीर (ता.अकोट) येथील पाच जण, गौरक्षण रोड येथील तिन जण, बाळापूर, मुर्तिजापूर व रजपूतपुरा येथील प्रत्येकी दोन, चांदुर, बोरगाव मंजू, मोठी उमरी, धोत्रासिंदे (ता.मूर्तिजापूर) आणि मुंडगाव (ता.अकोट) येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवासी आहेत.

दरम्यान, एका जणाचा मृत्यू झाला. हा रुग्ण मुंडगाव (ता.अकोट) येथील ७६ वर्षीय पुरुष असून तो (दि. १३ जुलै) रोजी दाखल झाला होता. त्यांचा उपचार घेताना मृत्यू झाला.

सकाळी प्राप्त अहवालानुसार
प्राप्त अहवाल - २१७
पॉझिटीव्ह-२६
निगेटीव्ह- १९१

आता सद्यस्थिती
एकूण पॉझिटीव्ह अहवाल- १९१५+२१ = १ हजार ९३६
मयत- ९८(९७+१)
डिस्चार्ज- १५९३
दाखल रुग्ण (ॲक्टीव्ह पॉझिटीव्ह)- २४५

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.