अकोला - कोरोना रुग्णांच्या संख्येत आज (मंगळवार) वाढ झाली आहे. 17 जण पॉझिटिव्ह सापडले असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. एकीकडे प्रशासनाकडून रुग्ण संख्या कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत असताना दुसरीकडे jरुग्णांच्या संख्येमध्ये वाढच होत आहे.
प्राप्त झालेल्या पॉझिटिव्ह अहवालांपैकी पुरुष आणि सात महिला आहेत. तर त्यातील चार जण हे भीम चौक अकोट फैल येथील तर अन्य सोनटक्के प्लॉट जुने शहर, सिंधी कॅम्प, मुजप्फरनगर लकडगंज, आंबेडकरनगर बसस्टॅंड मागे, फिरदौस कॉलनी, दगडी पूल, बैदपूरा, आदर्श कॉलनी सिंधी कॅम्प, अकोली बुद्रुक, गीतानगर जुनेशहर, हाजीनगर अकोट फैल, व्हीएचबी कॉलनी रतनलाल प्लॉट, मोमीनपुरा ताजनापेठ, रंगारहट्टी बाळापुर येथील रहिवासी आहेत.
दरम्यान या रुग्णांच्या संख्येने परिस्थिती आणखी गडद झाली आहे. रुग्णांची संख्या पाहता अकोलेकरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राप्त अहवाल-२००
पॉझिटिव्ह-१७
निगेटिव्ह-१८३