अकोला - कोरोना संसर्ग तपासणीचे 101 अहवाल प्राप्त झाले असून त्यातील 89 अहवाल निगेटिव्ह तर 12 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. दरम्यान, आज सकाळी 5 तर सायंकाळी 7 जण असे एकूण 12 जणांचे अहवाल प्राप्त झाले आहे. तर दोन महिला रुग्णांचा उपचार घेताना मृत्यू झाला आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
आज सायंकाळी 19 जणांनी कोरोनावर विजय मिळविल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. अकोला जिल्ह्यात पॉझिटिव्ह अहवालांची एकूण संख्या 985 झाली आहे. आजअखेर 314 पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
दिवसभरात 12 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. आज सकाळी 5 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात एक महिला असून 4 पुरुष आहेत. ते रजपुतपुरा, बेलोदे लेआऊट हिंगणारोड, गायत्रीनगर कौलखेडा, हरिहरपेठ व बाळापूर येथील रहिवासी आहेत.
आज सायंकाळी प्राप्त अहवालात 7 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात दोन महिला असून 5 पुरुष आहेत. ते हरिहरपेठ, अकोट फैल, मोठी उमरी, चांदुर खडकी रोड, शंकर नगर, वाडेगाव व बाळापूर येथील रहिवाशी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.
9 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून त्यात 12 महिला व सात पुरुष आहेत. त्यातील 7 जणांना कोविड केअर सेंटर येथे निरीक्षणात ठेवण्यात आले आहे, तर उर्वरित 12 जणांना घरी सोडण्यात आले आहे. त्यातील दोघे खडकी, 2 रामदास पेठ, 2 ध्रुव अपार्टमेंट, 2 सिंधी कॅम्प तर उर्वरीत जयहिंद चौक, श्रीहरी नगर, सिटी कोतवाली, आळेगाव पातूर, गजानन नगर, जुने शहर, हरिहर पेठ, माळीपुरा, रणपिसेनगर, हैदरपुरा व खदान येथील प्रत्येकी एक याप्रमाणे रहिवाशी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील सूत्रांनी दिली आहे.