अकोला - अकोल्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. आज(मंगळवार) सकाळी 32 जणांचे अहवाल प्राप्त झाले. त्यातील 21 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 11 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे अकोलेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामध्ये 3 मे ला 15, 4 मे ला 9 आणि आज(मंगळवार) 11 रुग्णांची भर पडली आहे. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांपैकी चारजण मोहम्मद अली रोड येथील तर उर्वरित पैकी दोनजण बैदपुरा, आणि बाकीचे गुलजारपुरा, खंगनपुरा, कृषी नगर, ताजनगर येथील रहिवासी आहेत. तसेच अंतरी या गावानंतर आजच्या अहवालानुसार पिंजर या गावातील रुग्णही सापडला आहे. त्यामुळे, एकूण पॉझिटिव्ह अहवाल असलेल्या व्यक्तींची एकूण संख्या 75 झाली असून प्रत्यक्षात 55 ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सूत्रांनी दिली आहे.
५ मे रोजी प्राप्त अहवाल - 32
पॉझिटिव्ह - 11
निगेटीव्ह - 21