ETV Bharat / state

लूटीचा बाजार; शेतकऱ्यांची ज्वारी 10 आणि व्यापाऱ्यांची 30 रुपये प्रती किलो - akola jowar farmers news

एकेकाळी गव्हापेक्षा निम्म्या पटीने स्वस्त असणारी ज्वारी आता दीड पट महाग झाली आहे. एवढेच नाही तर वर्षभर आणि आताही कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून ती आठ ते नऊ रुपये प्रति किलोने खरेदी करत आहे. नागरिकांना मात्र 30 रुपये प्रति किलोप्रमाणे व्यापारी विकत असल्याने शेतकऱ्यांसोबतच सामान्यांची लूट होत आहे.

farmers jowar just 10 rs kilo
farmers jowar just 10 rs kilo
author img

By

Published : Jan 13, 2021, 12:23 PM IST

अकोला - एकेकाळी गव्हापेक्षा निम्म्या पटीने स्वस्त असणारी ज्वारी आता दीड पट महाग झाली आहे. एवढेच नाही तर वर्षभर आणि आताही कृषी उत्पन्न बाजार समितीत व्यापारी शेतकऱ्यांकडून ती आठ ते नऊ रुपये प्रति किलोने खरेदी करत आहे. नागरिकांना मात्र 30 रुपये प्रति किलोप्रमाणे व्यापारी विकत असल्याने शेतकऱ्यांसोबतच सामान्यांची लूट होत आहे.

वर्षभर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांकडून केवळ नऊशे ते हजार रुपये प्रति क्‍विंटल दराने व्यापारी ज्वारी खरेदी करत असून हीच ज्वारी सामान्यांना 30 ते 35 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. सध्या ही बाजार समितीमध्ये 900 रुपये प्रति क्‍विंटल दराने ज्वारी खरेदी केली जात आहे.

शेतकऱ्यांची ज्वारी 10 आणि व्यापाऱ्यांची 30 रुपये प्रती किलो
उत्पन्न कमी असल्याने व्यापारी घेतात फायदासध्या व्यायाम, क्रीडा, आरोग्यासाठी वेळ मिळत नसल्याने सहज आहाराचा घेण्याचा सल्ला डॉक्टर तज्ञांकडून मिळायला लागला. त्यामुळे पुन्हा ज्वारीची मागणी वाढली. मात्र, तुलनेत उत्पन्न कमी असल्याने गव्हा पेक्षाही जास्त किंमत ज्वारीला आली. मागणी वाढत असल्याचा फायदा व्यापाऱ्यांनी घेतला आहे. ज्वारीच्या पेरणीतील अडथळाज्वारीची धान्य म्हणून कडब्याची चाऱ्यासाठी मागणी वाढल्याने या पिकाचा पेरा वाढला पाहिजे होता. परंतु, ज्वारीची पेरणी केल्यानंतर जंगली डुक्कर, हरिण, पक्षांमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. शिवाय उत्पन्नही इतर पिकांच्या तुलनेत कमी मिळत असून व्यापारी अल्पदरात ज्वारी खरेदी करीत असल्याने शेतकरी ज्वारी पेरण्यासाठी धजावत नाही.

हेही वाचा - मध्यप्रदेशात विषारी दारू पिऊन २० जणांचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.