ETV Bharat / state

Teacher Abusing Girl Students : शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे; पालकांनी दिला चोप - Parents of Students Slapped Teacher

शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेत ( Minor Students of Zilla Parishad School in Shirdi ) शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर मुलीप्रमाणे अन्य १० ते १२ अल्पवयीन मुलीसुद्धा ह्या शिक्षकांच्या शिकार झाल्या ( Minor Students of Zilla Parishad School in Shirdi ) आहेत. हे शिक्षक मुलींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत होत्या. असे मुलीने पोलिसांना सांगितले. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, हे शिक्षक मुलींना तुम्ही याची वाच्यता कुठे केल्यास तुमचा दाखला रद्द करण्याची धमकी देत ( Parents of Students Gave Good Slap to Teachers ) होते.

Ahmednagar Shirdi Sexual Harassment Case
जि.प. शाळेतील शिक्षकांचे विद्यार्थिनींसोबत अश्लील चाळे
author img

By

Published : Sep 20, 2022, 12:19 PM IST

Updated : Sep 20, 2022, 1:21 PM IST

अहमदनगर, शिर्डी : शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेत 7 वी व 8 वी वर्गातील अनेक अल्पवयीन विद्यार्थीनीना मोबाईलवरून ( Minor Students of Zilla Parishad School in Shirdi ) दोन शिक्षक अश्लील व्हिडीओ दाखवत त्यांच्याशी गैरवर्तन करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ज्यांना विद्यार्थी गुरू मानतात त्याच शिक्षकरूपी गुरूंच्या या कृत्यामुळे शिर्डीत असंतोषाची लाट उसळली असून, जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी या शिक्षकांना चांगलाच चोप ( Parents of Students Gave Good Slap to Teachers ) दिला. ह्या बातमीची माहिती मिळताच शिर्डी पोलिसांची फौज शाळेत दाखल होऊन ( Ahmednagar Shirdi Sexual Harassment Case ) आरोपी शिक्षकांना ताब्यात घेतले.

पालकांनी दिला शिक्षकांना चोप

शिक्षक मुलींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून करीत होते अश्लील चाळे : शिर्डीतील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेणाऱ्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. सदर मुलीप्रमाणे अन्य १० ते १२ अल्पवयीन मुलीसुद्धा ह्या शिक्षकांच्या शिकार झाल्या आहेत. हे शिक्षक मुलींना मोबाईलवरून अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करीत होते. असे मुलीने पोलिसांना सांगितले. हा प्रकार अनेक दिवसांपासून सुरू होता. मात्र, हे शिक्षक मुलींना तुम्ही याची वाच्यता कुठे केल्यास तुमचा दाखला रद्द करण्याची धमकी देत होते.

पालकांचा राग अनावर झाल्याने शिक्षकांना दिला चोप : गरीब कुटुंबातील या मुली भीतीपोटी हा प्रकार सहन करीत होत्या. तर एका मुलीने शाळेत जाणेच सोडले. तिचे शाळेत न जाण्याचे कारण जेव्हा तिच्या आईने विचारले तेव्हा या मुलीने रडत रडत सर्व हकीगत आईला सांगितली. मुलीच्या आईने ह्या गंभीर प्रकाराची माहिती इतर पालकांना सांगितली तेव्हा अनेक पालकांनी आपल्या मुलींना विश्वासात घेत विचारणा केली असता अनेक मुलींनी हे शिक्षक आम्हाला अश्लील फोटो दाखवत होते, असे सांगितल्याने हा प्रकार समोर आला आहे. त्यानंतर पालकांचा राग अनावर झाला आणि त्यांनी थेट शाळेत जाऊन ह्या शिक्षकांना जाब विचारला मात्र त्यांंचे उद्धट बोलणे आणि खोटं सोंग घेणे हे सर्वांच्या लक्षात आल्यावर पालकांनी ह्या शिक्षकाला चांगलाच चोप दिला.

शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षकांनी कठोर कारवाई करण्याचे दिल आदेश : दरम्यान, या घटनेची गंभीर दखल घेत पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांनी पोस्को कायद्या अंतर्गत भा.द.वि.कलम ८ व १२ यासह अनुसूचित जाती जमाती कायदा अंतर्गत कलम ३ (१) (w) (i) ( ii ) ३५४ प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, आरोपी संजय सखाहरी थोरात आणि राजेंद्र माधव थोरात या दोनही शिक्षकांना अटक केली आहे. याचबरोबर इतर अल्पवयीन मुलींचे जबाब नोंदवून आणखी कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती शिर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील यांनी दिली.

जिल्हा परिषद शाळेला दीडशेहून जास्त वर्ष : शिर्डी साईबाबांच्या या पावनभूमीतील या जिल्हा परिषद शाळेला दीडशेहून जास्त वर्ष झाली आहे. सन १८८१ साली ह्या शाळेची स्थापना झाली होती. शिर्डीतील अनेक दिग्गज नागरिक ह्या शाळेचे विदयार्थी आहेत. त्यामुळे शिर्डी ग्रामस्थांचे या शाळेविषयी जिव्हाळ्याचे नाते आहे. परंतु आजवरच्या इतिहासात प्रथमच ह्याच शाळेत असा गंभीर प्रकार घडल्याने शिर्डीत संतापाची लाट पसरली आहे. नागरिकांना या शिक्षकांना कठोर शिक्षा तसेच यांना कायमस्वरूपी बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

Last Updated : Sep 20, 2022, 1:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.