अहमदनगर - कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थिनींनी बचत केलेल्या खाऊच्या पैशातून सीमेवरील जवानांसाठी राखी बनविली आहे. या राख्या आणि रक्षाबंधन तसेच स्वातंत्र्यदिनाच्या संदेशरुपी शुभेच्छा देणारी भेटकार्ड्स जवानांना पाठविण्यात आली आहेत.
रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून भारतीय सीमेचे रक्षण करणाऱ्या जवानांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी विद्यार्थिनींनी आपल्या खाऊच्या पैशातून राख्या बनविल्या आहेत. या विद्यार्थींनीनी 'एक राखी जवानांसाठी' हा उपक्रम राबवून त्यांच्या स्वहस्ते या राख्या तयार केल्या आहेत.
विद्यार्थीिनींचा हा खरोखरच स्तुत्य उपक्रम आहे. या उपक्रमामुळे जवानांनाही देश त्यांच्या पाठीमागे भक्कम उभा असल्याची जाणीव होईल, असे मत कोपरगाव तालुका गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी यावेळी व्यक्त केले.