अहमदनगर - शहरातील इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा झालेल्या दोन तरुणांनी एका पोर्टेबल मिनी व्हेंटिलेटरची निर्मिती केली आहे. त्यानंतर जिल्हा रुग्णालयाला हे मशीन भेट म्हणून दिले. कोरोना संकाटाच्या काळात व्हेंटिलेटरचा तुटवडा आहे, अशात त्यांनी बनवलेले व्हेंटिलेटर फायदेशीर ठरत आहे.
विशाल आणि प्रशांत सिसोदिया, असे या तरुणांची नावे आहेत. सध्या देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. देशात कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजरांवर पोहोचला आहे. त्यात महाराष्ट्र सर्वाधिक रुग्ण आहेत. राज्यातील प्रत्येक रुग्णालयामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यामुळे व्हेंटिलेटरचा काही प्रमाणात तुटवडा निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे विशाल आणि प्रशांत या दोन्ही तरुणांनी व्हेंटिलेटर बनविण्याचे ठरविले. त्यानुसार त्यांनी घरीच उपलब्ध साधनसामग्रीचा वापर करून पोर्टेबल मिनी व्हेंटिलेटरची निर्मिती केली. त्यानंतर हे व्हेंटिलेटर जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिले. त्यांच्या या मिनी व्हेंटिलेटरचे सर्वत्र कौतुक होत आहे.
विशाल आणि प्रशांत लवकरच डिजिटल स्वरुपातील पोर्टेबल व्हेंटिलेटरची निर्मिती हे तरुण करणार आहेत. तसेच आपल्या ज्ञानाचा उपयोग करून इतर तरुणांनी देखील या संकटकाळात पुढे येऊन मदत करावी, असे आवाहन दोन्ही तरुणांनी केले आहे.