अहमदनगर - वडापावच्या किंमतीवरून झालेल्या भांडणात एका युवकाचा जीव गेला. युवकाला ( Man killed in quarrel over Vada pav in Ahmednagar ) बेदम मारहाण झाली होती. त्याला जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. अहमदनगर येथील एमआयडीसी ( fight over Vada pav in Ahmednagar ) भागातील सह्याद्री चौक परिसरामध्ये मंगळवारी ही घटना घडली. प्रवीण कांबळे, असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
हेही वाचा - सहकाराला सेवा क्षेत्रातही आता प्रवेश करावा लागेल - रिझर्व्ह बँकेचे संचालक सतिष मराठे
मंगळवारी दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास प्रवीण कांबळे हा एका वडापावच्या ( Fight over Vadapav news Ahmednagar ) दुकानावर वडा खाण्यासाठी गेला होता. मात्र, दुकानदाराने त्याला वडापाव 20 रुपयेला असल्याचे सांगितल्यानंतर पाच रुपये कमी करा या गोष्टीवरून दोघांमध्ये चांगलीच वादावादी झाली आणि या वादावादीचे रुपांतर हाणामारीत झाले.
वडापाव दुकानदाराला आसपास असलेल्या काही लोकांनी मदत करून प्रवीण कांबळे याला बेदम मारहाण केली होती. त्यानंतर प्रवीण यास गंभीर जखमी अवस्थेत जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, बुधवारी सकाळी प्रवीण कांबळे याचा मृत्यू झाला. प्रवीण कांबळे याची आई शोभा कांबळे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून, अजून काही आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना केली असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज आठरे यांनी दिली.
या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात करण्यात यावी आणि आरोपींना फाशीची शिक्षा होण्याकरता पोलीस प्रशासनाने योग्य तो तपास करावा, अशी मागणी सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सुरेश बनसोडे यांनी केली.
हेही वाचा - Sai Sansthan Donation : कोरोनानंतर केवळ दोन महिन्यात साई संस्थानला 61 कोटींचे दान